शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दमदाटी करून केला गर्भपात

By admin | Updated: December 11, 2015 00:58 IST

माहेराहून हुंडा आणण्यासाठी छळ करीत पती, दीर व सासूने मिळून दमदाटी करीत विवाहितेचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे : माहेराहून हुंडा आणण्यासाठी छळ करीत पती, दीर व सासूने मिळून दमदाटी करीत विवाहितेचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती व दिराला अटक करण्यात आली आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.प्रशांत हणमंत भोसले (वय ३०), प्रीतम हणमंत भोसले (वय २७, दोघेही रा. वाराणसी हौसिंग सोसायटी, वारजे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तसेच, सुमन हणमंत भोसले (वय ५०) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहिणी प्रशांत भोसले (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. १७ जून ते २१ नोव्हेंबर या कालावधीत घडला. लग्नात आई-वडिलांनी मानपान केला नाही, सोने दिले नाही. आता माहेराहून १५ तोळे सोने व फ्रिज घेऊन ये, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच, मारहाणही करण्यात आली. तसेच घरच्यांच्या दबावामुळे लग्न केल्याचे सांगत पतीनेही त्यांचा छळ केला. फिर्यादी सात महिन्यांच्या गर्भवती असताना पतीने हे मूल आता आपणास नको आहे. तू गर्भपात करून घे, अन्यथा नांदवणार नाही, अशी दमदाटी केली. त्यांच्यावर दबाव आणून तिघा आरोपींनी जबरदस्तीने गर्भवात करून घेतला.