तमाशा, शाहिरी, लोककला प्रतिनिधी म्हणून जिल्हा सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र शासन वृद्ध साहित्यक व कलाकार मानधन समिती पुनर्रचना करण्याचे निर्देश
दिले असता जिल्हास्तरीय कमिटी तमाशा, शाहिरी, लोककला विभागातून प्रतिनिधी म्हणून अभय वाव्हळ यांची जिल्हा सदस्यपदी नियुक्ती केली आहे. अभय वाव्हळ हे कलाकार असून चित्रपट ,नाट्य दिग्दर्शक व लेखक आहेत. गेली १० वर्षांपासून ते चित्रपट क्षेत्रात काम करीत आहेत .
ह्यापुढील काळात वृद्ध साहित्यिक आणि कलाकार,तमाशा,शाहिरी, लोककलावंत क्षेत्रातील बांधवांचे, प्रलंबित प्रश्न सोडवून कलावंतांना जास्तीत जास्त मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे वाव्हळ सांगितले .
फोटो क्रमांक - १७ नारायणगाव अभय वाव्हळ