शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी रंगणार ‘अभंगरंग’

By admin | Updated: June 30, 2017 03:55 IST

‘भक्तिगीत कल्पतरू, भक्तीरस हा गोड’ याची प्रचिती देणारी, आषाढी एकादशीचे औचित्य साधून रसिकांना भक्तीरसाच्या भावाची

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘भक्तिगीत कल्पतरू, भक्तीरस हा गोड’ याची प्रचिती देणारी, आषाढी एकादशीचे औचित्य साधून रसिकांना भक्तीरसाच्या भावाची अनुभूती देणारी आणि विठ्ठलाचा भक्तीरस गायनातून आळवण्याची मेजवानी देणारी ‘अभंगरंग’ ही अद्भूत मैफल पुणेकर रसिकांना सोमवारी अनुभवता येणार आहे. शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भक्तिगीतांचा सुरेल आणि भावस्पर्शी आविष्कार कोथरूडमधील पंडित फार्म्स येथे सायंकाळी ५.३० वाजता रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक असून केसरी टूर्स, चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशन, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स हे आहेत. काका हलवाई स्वीट सेंटर, कावरे आईस्क्रिम, शिवसाई मोटार ड्रायव्हिंग स्कूल सहप्रायोजक आहेत. फॅशन पार्टनर पँटलून्स असून आऊटडोअर पार्टनर धीरेंद्र अ‍ॅडव्हर्टायझर आहेत. लोकमत सखी मंचाच्या वतीने यूएसके फाउंडेशन प्रस्तुत व कोहिनूर ग्रूपच्या सहयोगाने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. ३) ‘अभंगरंग’ या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये पं. शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे व जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुमधूर गीतांचा व अभंग गायनाचा आस्वाद घेण्याची संधी लोकमत सखी मंच सभासदांना आणि वाचकांना मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), निखिल फाटक (तबला), ओंकार दळवी (पखवाज), आदित्य आपटे (टाळ) यांची सुरेल साथसंगत लाभणार आहे. अनय गाडगीळ यांचे संयोजन, तर मिलिंद कुलकर्णी यांचे निवेदन कार्यक्रमाची रंगत वाढवेल. आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित केलेला भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम रसिकांसाठी सुमधूर पर्वणीच ठरणार आहे. लोकमतच्या वाचकांना प्रवेश खुला लोकमत सखी मंचच्या सभासदांसाठी ओळखपत्रावर विशेष निमंत्रण असून ‘लोकमत’च्या वाचकांसाठी प्रवेश खुला आहे. वेळ : सोमवार, दि. ३ जुलै, २०१७ रोजी सायं. ५.३० वाजतास्थळ : पंडित फार्म्स, न्यू डीपी रोड, कोथरूड.