शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून लुटणारे गजाआड

By admin | Updated: January 16, 2016 02:38 IST

सरदवाडी (ता. शिरूर) येथील माणिकचंद कंपनीचे व्यवस्थापक लुईस चार्लेस सिनीठेवन (रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांचे कंपनीजवळून अपहरण करून त्यांच्याजवळील सव्वा लाखाचा ऐवज

शिरूर : सरदवाडी (ता. शिरूर) येथील माणिकचंद कंपनीचे व्यवस्थापक लुईस चार्लेस सिनीठेवन (रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांचे कंपनीजवळून अपहरण करून त्यांच्याजवळील सव्वा लाखाचा ऐवज लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी २४ तासांतच गुन्ह्याचा तपास लावून चौघा जणांना गजाआड करण्यात यश मिळविले. २० डिसेंबर २०१५ रोजी सिनीठेवन कंपनीतून बाहेर पडले असताना काही अंतरावर तिघांनी त्यांच्या कारला हात केला व माणिकचंद फॅक्टरी कुठे आहे, अशी विचारणा केली. तेवढ्यात तिघांपैकी दोघांनी कारचा मागील दरवाजा उघडून प्रवेश केला. सिनीठेवन यांना दोघांनी खेचून मागे ओढले. त्यानंतर पत्ता विचारणाऱ्याने कारचा ताबा घेऊन मोटार पुणे-नगर रस्त्याने अहमदनगर बाजूला नेली. मारण्याची धमकी देऊन त्यांच्याजवळील सव्वा लाखांचा ऐवज काढून घेतला़ यानंतर सिनीठेवन यांना रात्रभर एका अज्ञात ठिकाणी रूममध्ये डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी (२१ डिसेंबर) सकाळी ९ वाजता त्यांना सुपा टोलनाक्याजवळ कारसह सोडून दिले. १३ जानेवारीस हा गुन्हा शिरूर पोलिसांत दाखल झाला. यानंतर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उत्तम भजनावळे व त्यांच्या पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवली. तपासात कंपनीतील एक कामगारच या गुन्ह्यामागचा सूत्रधार असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी प्रथम सूत्रधारास ताब्यात घेतले. पोलिसीखाक्या दाखविल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले. या चार जणांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली. सहायक निरीक्षक भजनावळे अधिक तपास करीत आहेत. सोमनाथ वाफगावकर, मधुकर भोईर, श्रीनिवास माने यांचा तपास पथकात समावेश होता.