शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आपटी गाव रस्त्यापासून वंचित

By admin | Updated: April 8, 2016 00:51 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शिनोली, गंगापूर या थोड्या सुधारलेल्या गावांजवळ परंतु डोंगरमाथ्यावर वसलेले आपटी हे एक आदिवासी गाव

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शिनोली, गंगापूर या थोड्या सुधारलेल्या गावांजवळ परंतु डोंगरमाथ्यावर वसलेले आपटी हे एक आदिवासी गाव. स्वातंत्र्यपूर्व आधीपासून हे गाव येथे वसलेले आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरीही या गावाला दळणवळणासाठी अद्यापही रस्ता न मिळाल्याने आजही येथील गावकरी एक प्रकारे अज्ञातवासात राहात आहेत. या गावाला रस्ता होण्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार निवेदने दिली. पिढ्यांमागून पिढ्या सरल्या. मात्र रस्ता होण्याऐवजी मागण्या-निवेदनांना प्रत्येक वेळी सरकार दरबारी केराचीच टोपली मिळत आली आहे. मंजूर रस्त्याला वन विभागाच्या हरकतीमुळे आपटीच्या आदिवासींचे जिणे अवघड झाले आहे. रस्त्यासाठी आता गावकऱ्यांनी शेवटची लढाई हाती घेतली आहे. ११ एप्रिलपासून रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.आपटी (ता.आंबेगाव) हे गाव आदिवासी ५व्या अनुसूचित क्षेत्रातील गाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिनोली व गंगापूर गावापासून जवळ असलेले हे गाव उंच डोंगर माथ्यावर वसलेले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ५००च्या वर असून, सुमारे ६० ते ७० आदिवासी कुटुंबे येथे पिढ्यान्पिढ्यांपासून वास्तव्यास आहेत. गावाच्या खालचा डोंगर हा वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने या गावाच्या विकासाला एक प्रकारची खिळ बसली आहे. दळणवळणाच्या गैरसोयीअभावी मृत व्यक्तींना घरापर्यंत नेणे शक्य नसल्याने त्यांचेही दफन रस्त्यातच उरकावे लागते. दळणवळणाच्या गैरसोयींमुळे आपटीच्या ग्रामस्थांना जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागत आहेत.वारंवार अर्ज-विनवण्या करूनही, तुमची फाईल पुढे नागपूरला पाठविली आहे, मंजुरी आली की कळविले जाईल, अशी उत्तरे वन विभागाकडून दिली जात असली, तरी पिढ्यांमागून पिढ्या उलटून चालल्या, तरीही वन विभागाची परवानगी मिळत नसल्याने दळणवळणाच्या गैरसोयीपाई आपटीच्या गावकऱ्यांना मात्र हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार अर्ज विनंत्या करून थकलेल्या ग्रामस्थांनी आता शेवटची लढाई लढण्याचे ठरविले आहे. रस्त्याच्या मागणीसाठी ११ एप्रिल २०१६ पासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असल्याचे एका लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे. माजी विधासभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय घोडेगाव यांना निवेदन दिले आहे. ११ एप्रिलपासून आपटी ग्रामस्थांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.