शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘सत्यमेव जयते’बाबत आमिर खानला उत्तर देण्याचे निर्देश

By admin | Updated: March 12, 2016 03:54 IST

बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राजमुद्रेचा वापर न करताच ‘सत्यमेव जयते’ असे लिहिण्यात येत

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राजमुद्रेचा वापर न करताच ‘सत्यमेव जयते’ असे लिहिण्यात येत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. याबाबत उच्च न्यायालयाने संबंधित दूरचित्रवाणी वाहिनी आणि आमीर खान याला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ‘सत्यमेव जयते’ हे राष्ट्रीय चिन्हाचा भाग आहे. मात्र या कार्यक्रमात राजमुद्रेचा वापर न करता केवळ ‘सत्यमेव जयते’चा वापर करण्यात येतो. त्यामुळे ‘स्टेट एम्ब्लेम आॅफ इंडिया’ (प्रतिबंध आणि अयोग्य वापर) कायदा आणि ‘स्टेट एम्ब्लेम आॅफ इंडिया’ (वापरासंबंधी नियम) नियमांचे उल्लंघन केले जात आहे, असे याचिकाकर्ते मनोरंजन रॉय यांनी याचिकेत नमूद केले आहे.या याचिकेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने केवळ ‘सत्यमेव जयते’चा वापर करून कायद्याचे किंवा नियमाचे उल्लंघन करण्यात आले नसल्याची भूमिका उच्च न्यायालयापुढे घेतली. ‘बोधचिन्हातील ‘सत्यमेव जयते’च वापरल्याने कायद्याचा किंवा नियमांचा भंग होत नाही. राष्ट्रीय बोधचिन्हाचा गैरवापर होऊ नये, यासाठी कायद्यात व नियमांत तरतूद करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. भविष्यात कोणी बोधचिन्ह म्हणून केवळ राजमुद्राच वापरली आणि ‘सत्यमेव जयते’ वापरले नाही तरीही तुम्ही अशीच भूमिका घ्याल का?, अशी विचारणा न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी केंद्राला केली. अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांना २० मार्च रोजीच्या सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)