शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अबब!... पालिका लावणार एक लाखाचा एक फलक

By admin | Updated: December 24, 2014 01:36 IST

महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या जमाखर्चाचा ताळमेळ बिघडला असल्याने या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात तब्बल १२00 कोटी रुपयांची तूट येणार आहे.

पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या जमाखर्चाचा ताळमेळ बिघडला असल्याने या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात तब्बल १२00 कोटी रुपयांची तूट येणार आहे. त्यामुळे एकीकडे अंदाजपत्रकातील विकासकामांना ५० टक्के कात्री लावली असतानाच; दुसरीकडे मात्र, स्थायी समितीची उधळपट्टी सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत शहरातील ५१ ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी प्रत्येकी एक माहितीफलक लावण्यासाठी तब्बल ५७ लाख रुपयांचा खर्चास मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाकडून ठेवण्यात आलेल्या या प्रस्तावात या वास्तूंच्या ठिकाणांचा साधा उल्लेख आणि फलक कसे असतील याची चार ओळींची माहिती नसतानाही, समितीने डोळे झाकून या प्रस्तावास मान्यता दिली असल्याचे दिसून आले. त्यामुळे या वास्तूंच्या ठिकाणी बसविला जाणारा प्रत्येक फलक महापालिकेस एक लाखास पडणार आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या पुणे शहरात शनिवारवाडा, लाल महल, पांचाळेश्वर मंदिर, आगाखान पॅलेस, फुलेवाडा, टिळकवाडा यांसारख्या वास्तू आहेत. याशिवाय अनेक ऐतिहासिक वास्तूही आहेत. या ठिकाणी पर्यटकांनी भेट द्यावी, यासाठी महापालिकेकडून पुणे दर्शन ही बससेवाही सुरू करण्यात आली आहे. तर शहरातील काही मंदिरे आणि प्रमुख उद्यानेही असून, त्या ठिकाणी भेट देण्यासाठी वर्षभर पर्यटक शहराला भेटी देत असतात, या ठिकाणांची माहिती पर्यटकांना मिळावी तसेच त्या वास्तूंची माहिती संक्षिप्त स्वरूपात असावी यासाठी सुमारे ५७ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव भवन रचना विभागाकडून स्थायी समितीसमोर आयत्या वेळी ठेवण्यात आला होता. त्यास कोणतीही स्पष्ट स्वरूपातील माहिती नव्हती. असे असतानाही, समितीने केवळ या हेरिटेज वास्तू आहेत, म्हणून त्यास मान्यता दिली.