घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील माळीण पुनर्वसीत आमडे गावठाणात विविध नागरी सुविधा राबविण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने ९९ लाख १९ हजार ९०६ रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, शाळा इमारत, अंगणवाडी आदींचा समावेश आहे. पुणे जिल्हा परिषदेत सभापती मंगलदास बांदल यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची बैठक झाली. नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा परीषदने निधी देण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये शाळा इमारतीसाठी ३५ लाख रुपये, आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामासाठी ३१ लाख २१ हजार रुपये, अंगणवाडी इमारतीसाठी १२ लाख रुपये, समाज मंदिर इमारत बांधकामासाठी ५ लाख रुपये निधीस मंजुरी दिली. (वार्ताहर)
माळीण गावठाणासाठी ९९ लाख
By admin | Updated: July 6, 2015 04:57 IST