शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणाऱ्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माधव हनुमंत वाघाटे याच्या खुनानंतर त्याच्या पार्थिवाची शेकडोंच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : माधव हनुमंत वाघाटे याच्या खुनानंतर त्याच्या पार्थिवाची शेकडोंच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे पोलिसांना आव्हान दिल्यावर काय होते, याचा प्रत्यय या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांना आला. पुणे पोलिसांच्या १५ पथकांनी रात्रीचा दिवस एक करुन तब्बल ९६ जणांना शोधून अटक केली. ४० हून अधिक गाड्या जप्त केल्या. मोठा पोलीस फौजफाटा घेऊन या सर्वांची ससून रुग्णालय, गंगाधाम व धनकवडीतील सेंटरवर रॅपिट टेस्ट केली. सुदैवाने त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यानंतर या सर्वांना न्यायालयात नेले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे येरवडा कारागृहात दाखल करण्यापूर्वी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली. त्याचा रिपोर्ट उद्या येणार आहे. कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर एकाच गुन्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोपींना अटक करुन त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयापुढे हजर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोरोनाचा संसर्ग आणि त्याबाबत घ्यावयाची दक्षता यामुळे सध्या आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मोठे परिश्रम करावे लागत असतात.

माधव वाघाटे याचा बिबवेवाडी पोलीस चौकीच्या समोर १० जणांनी खून केला. त्यानंतर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुमारे २० जणांनी त्याची अंत्ययात्रा काढली होती. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांवर चौफर टीका होऊ लागली. आम्ही बाहेर पडलो तर लगेच ५०० रुपये दंड आकारतात, मग अशा वेळी पोलीस कोठे गेले होते, अशी विचारणा सोशल मीडियावर होऊ लागली. याची दखल घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गुन्हे शाखेतील १५ पथके, परिमंडळ २, सहकारनगर, भारती विद्यापीठ व इतर पोलीस ठाण्यातील पोलिसांची मदत घेण्यात आली. त्यासाठी १५ पोलीस पथकांची स्थापना केली. या पथकांनी धनकवडी ते कात्रज स्मशानभूमी या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यातून दुचाकी, कार व रिक्षा यांचे नंबर घेऊन तसेच गाड्यांवरील आरोपींचे पडताळणी करुन त्यांना ताब्यात घेण्याचा सपाटा लावला़ रविवारी संपूर्ण दिवसभर ही कारवाई करण्यात आली़ सायंकाळपर्यंत ८० जणांना अटक केली़ इतक्या मोठ्या प्रमाणावर अटक केलेल्या लोकांना कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांची वैद्यकीय तपासणी, रॅपिड टेस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्याची आवश्यकता होती़ त्यासाठी राखीव पोलीस फौजफाटा गाड्या मागविल्या. जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांची मदत घेतली. शहरातील वेगवेगळ्या चाचणी केंद्रावर या आरोपींना बंदोबस्तात नेले. रात्रभर या सर्व आरोपींची टेस्ट करण्यात आली. त्यानंतर मोठ्या बंदोबस्तात त्यांना दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोनाची चाचणी करण्यात येऊन कारागृहात रवानी केली आहे. गुन्हे शाखेतील १५ पथके, परिमंडळ २ आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून ही कारवाई पूर्ण केली. सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. खेंगरे अधिक तपास करीत आहेत.