शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

९१ लाखांचा गैरव्यवहार?

By admin | Updated: September 8, 2016 01:36 IST

बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामात ९१ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

बारामती : बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामात ९१ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. नगरपालिकेच्या गोडावूनमधील विद्युत साहित्य बाहेर नेऊन विकले आहे, त्याचे पुरावे आहेत, असा आरोप करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली होती. त्या वेळी नगराध्यक्षांनी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्याची घोषणा केली होती. परंतु आजअखेर चौकशी समितीचा फक्त फार्स केला आहे. संबंधित विद्युत अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. बारामती नगरपालिकच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी ठेका दिला जातो. सध्याच्या स्थितीत बारामती शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांचे काम झाले आहे. त्याचबरोबर नव्याने केलेल्या पथदिव्यांच्या कामातील देखभाल, दुरुस्तीचे काम केलेल्या ठेकेदाराकडेच आहे. जवळपास १४०० पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार करीत आहे. रिंगरोडच्या अंतर्गत असलेल्या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम बारामती टोलवेज कंपनीकडे आहे. याच अनुषंगाने उर्वरित कामासाठी ठेकेदारी पद्धतीने काम दिले. बारामती नगरपालिकेच्या विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामातील ९१ लाख रुपयांचा गैरप्रकार केला आहे. नगरपालिकेच्या गोडाऊनमधील मीटर बॉक्स नेऊन त्यांची रंगरंगोटी वापरले असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला होता. त्याचबरोबर जुने सोडीयम व्हेपर दिवे विकल्याचा आरोप नगरसेवक सुनील सस्ते यांनी केला होता. त्याचा पुरावा असल्याचे सांगताना ज्या टेम्पोमधून या साहित्याची वाहतूक केली, त्याचे नंबरदेखील आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतच पोलखोल होत असल्याचे निदर्शनास आल्यावर या कामाचे रेकॉर्ड सीलबंद करण्यात आले आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. या कामाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील चौकशीची मागणी केली होती. घडलेला प्रकार खरा असल्याचे सांगताना चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे सांगण्यात आले. त्या वेळी पक्षाच्या धोरणाविरोधात मत मांडले जात असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना या प्रकरणात पक्षाला मध्ये आणू नका, त्याचबरोबर कोणाला वैयक्तिक अडचणीत आणण्याचा प्रकार नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने काम झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाची मुख्याधिकारी चौकशी करतील, असे सभेत नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी जाहीर केले. त्याचबरोबर नगरअभियंता जीवन केंजळे यांच्यासह आणखी एका अधिकाऱ्याच्या समवेत चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र, त्यामध्ये नगरसेवकांचा समावेश न झाल्याने समितीचा फार्सच ठरला आहे. (प्रतिनिधी)