शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या ९०० सुरक्षा रक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड

By admin | Updated: April 9, 2017 04:47 IST

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१७-१८च्या अंदाजपत्रकामध्ये सुरक्षारक्षकांसाठी तरतूदच केली नाही. यामुळे पुण्यातील अनेक महत्त्वाचे प्रामुख्याने पाणी पुरवठ्याचे

पुणे : महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१७-१८च्या अंदाजपत्रकामध्ये सुरक्षारक्षकांसाठी तरतूदच केली नाही. यामुळे पुण्यातील अनेक महत्त्वाचे प्रामुख्याने पाणी पुरवठ्याचे प्रकल्प, विविध उद्यानांची सुरक्षा भविष्यकाळात रामभरोसेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे मात्र महापालिकेच्या तब्बल ९०० सुरक्षा रक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड ओढवली आहे.महापालिकेच्या वतीने शहरातील विविध उद्याने, महत्त्वाचे प्रकल्प, वेगवेगळी कार्यालये येथे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महापालिकेचे काही जण सेवक आहेत तर काही जणांची खाजगी एजन्सीच्या मार्फत कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांत शहरात उद्यानांची संख्या, नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्र, जलतरण तलाव यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय पर्वती जलकेंद्रासारखे अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची सुरक्षादेखील महत्त्वाची आहे. त्यात क्षेत्रीय कार्यालये, महापालिका भवन येथे तर सुरक्षा रक्षकांची मोठी फौजच तैनात असते. यामुळे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या वतीने आॅऊट सोर्सिंग करून कंत्राटी पद्धतीवर या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे.आयुक्तांनी अंदाजपत्रकामध्ये सुरक्षारक्षकांसाठी तरतूद कमी केल्याने शहरातील जवळपास ९०० कंत्राटी सुरक्षारक्षकांना कमी करावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये सुरक्षारक्षकांच्या बजेटवर स्थायी समिती किती तरतूद करणार यावरच या सुरक्षारक्षकांचे भवितव्य अवलंबून आहे.(प्रतिनिधी)- महापालिकेच्या सर्व मिळकतींच्या संरक्षणासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये दर वर्षी सरासरी ३५ ते ४० कोटी रुपयांची तरतूद केली जाते. परंतु महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सुरक्षा रक्षकांच्या अंदाजपत्रकाला यंदा मोठा कट लावला असून, सुरक्षा रक्षकांसाठीचे बजेट निम्म्यावरच आणून ठेवले आहे. महापालिकेकडे सध्या सुमारे १७५० सुरक्षारक्षक कार्यरत आहेत.