शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

87.23%जिल्ह्याचा निकाल

By admin | Updated: May 26, 2016 03:35 IST

इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.२३ टक्के लागला असून, मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२.१० टक्के मुली, तर ८३.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

पुणे : इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.२३ टक्के लागला असून, मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२.१० टक्के मुली, तर ८३.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. पुणे विभागात जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात १ लाख १४ हजार ६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये ४७ हजार ६४४ मुलींचा समावेश आहे, तर ५१ हजार ७३० मुले उत्तीर्ण झाली आहेत. वेल्हा तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक लागला आहे. तर सर्वांत कमी निकाल मावळ तालुक्याचा ८२. ६८ टक्के लागला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १० टक्के अधिक आहे. जिल्ह्याच्या तालुकानिहाय निकालाची टक्केवारी आंबेगाव - ९१.४६बारामती - ८९.५९भोर - ८५.३९दौंड - ८४.५१हवेली - ८५.३३इंदापूर - ८९.१५जुन्नर - ८६.६०खेड - ८६.६९मावळ - ८२.६८मुळशी - ८४.४८पुरंदर - ८६.९८शिरूर - ९०.३०वेल्हा - ९३.७३पुणे शहर (प.) - ८७.२०पुणे शहर (पू.) - ८५.५२पिंपरी चिंचवड - ९०.०१विभाग निहाय व श्रेणी निहाय उत्तीर्ण विद्यार्थी विभाग७५% व पुढे६०% व पुढे पुणे१२,७७६७,०५३नागपूर७,६०५४०,९१३औरंगाबाद११,८९९७०,०४४मुंबई३३,३७३८६,६२२कोल्हापूर६,५४३३५,८९७अमरावती८,८५५५०,०१९नाशिक५,४३९५४,२१०लातूर५,६६०२५,३५१कोकण१,९७८११,५५८काही वर्षांपासून राज्य मंडळाच्या निकालाच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत चालली होती. सीबीएसई बोर्डाप्रमाणे राबविलेल्या जात असलेल्या ८०/२० पॅटर्नमुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सरसकट २० पैकी २० गुण दिले जात असल्याने निकाल फुगलेला दिसत होता. मात्र, यंदा प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी बहि:स्थ परीक्षकांची नियुक्ती केली. त्यामुळे बारावीच्या २०१६ च्या निकालात ४.६६ टक्क्यांनी घट झाली. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल चांगला लागावा, या हेतूने काही शिक्षकांकडून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे गुण सढळ हाताने दिले जात होते. परिणामी विद्यार्थ्यांना १५ ते २० टक्के गुण सहज मिळत होते. त्यामुळेच निकालाची टक्केवारी वाढत चालली होती. मात्र, राज्य मंडळाने यंदा बारावीच्या परीक्षेसाठी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बहि:स्थ परीक्षांची नियुक्ती केली होती. त्याचप्रमाणे पर्यावरण शिक्षण परीक्षेसाठीही बहि:स्थ शिक्षक नियुक्त करण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांना सढळ हाताने दिल्या जाणाऱ्या गुणांवर यंदा नियंत्रण आले. त्याचप्रमाणे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या जात होत्या. त्यामुळे यंदा बारावीच्या निकालात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.- गंगाधर म्हामणे, राज्य मंडळाचे अध्यक्ष