मंचर : येथील भारतीय स्टेट बँकेच्या मंचर शाखेत बचत खाते व एटीएम कार्ड असलेल्या निशा सुनील शिंदे (रा. अवसरी खुर्द) व वर्षा सतीश मावकर (रा. चांडोली बुद्रुक) या दोन महिलांना भूलथाप देऊन त्यांच्या खात्यातून 87 हजार 5क्क् रुपये ऑनलाईन पद्धतीने लुटण्यात आली. हॉटेल व विविध दुकानांतून वस्तू खरेदी करण्यासाठी ही रक्कम लाटण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून पासवर्ड काढून घेण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मावकर यांना 76849969क्6 व शिंदे यांना 99क्5742417 या मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. हे दोन्ही मोबाईल आज सुरू आहे. या महिलांनी संपर्क साधला असता तुमचे पैसे दोन दिवसांत खात्यात जमा होतील, असे संबंधित इसमांनी सांगितले आहे.
दरम्यान, दोन्ही महिलांनी याविषयी मंचर पोलीस ठाणो व भारतीय स्टेट बँक मंचर शाखेत तक्रार अर्ज दिला आहे. संबंधित ऑनलाईन पद्धतीचा वापर करून पैसे हॉटेल व खरेदीसाठी वापरल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. एटीएमधारकांनी त्यांचा पासवर्ड कोणाला देऊ नये. सदर चोरटय़ांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
4भारतीय स्टेट बँकेच्या मुख्यालयातून मी बोलत आहे. तुमचे एटीएम कार्ड लॉक झाले आहे. ते सुरू करण्यासाठी पासवर्ड सांगा, असे अनोळखी व्यक्तीने मावकर व शिंदे यांना भ्रमणध्वनीवरून सांगितले. बँकेच्या अधिका:याने संपर्क साधला आहे, असे समजून निशा शिंदे व वर्षा मावकर यांनी त्यांचे पासवर्ड संबंधित व्यक्तीला सांगितले. शुक्रवारी त्या बँकेत गेल्या तेव्हा खात्यात पैसे कमी असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना धक्का बसला.