शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

८२ टक्के कोरडवाहूंना न्याय देणार

By admin | Updated: April 27, 2015 04:51 IST

दुष्काळी पुरंदरला न्याय देणारच, गुंजवणीचे पाणी आणणारच पण याचबरोबर राज्यात अडचणीत असणारे १९२ तालुके आहेत.

खळद : दुष्काळी पुरंदरला न्याय देणारच, गुंजवणीचे पाणी आणणारच पण याचबरोबर राज्यात अडचणीत असणारे १९२ तालुके आहेत. आघाडी सरकारच्या काळात हजारो कोटींचे घोटाळे झाले; पण सिंचन क्षेत्र मात्र १८ टक्के इतकेच राहिले, तर ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. सध्या येथील शेतकरी अडचणीत आहे. या लोकांना न्याय देण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक काम या पुढील काळात करणार असल्याचे राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.खळद येथे जलयुक्त शिवार अभियानअंर्तगत नाला खोलीकरण, २० लाख रुपये खर्चाचे गावठाण ते घोडकेमळा रस्ता डांबरीकरण, दशक्रिया विधी घाट या कामांचे भूमिपूजन तसेच, शाखा नूतनीकरण व नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख पुरंदर दिलीप यादव, हवेली तालुका प्रमुख संदीप मोडक, युवासेना अध्यक्ष उमेश गायकवाड, उपतालुका प्रमुख कैलास कामथे, सुभाष गायकवाड, धीरज जगताप, रमेश इंगळे, नामदेव झुरंगे, मंडल कृषी अधिकारी मासाळ, कृषी सहायक संजीव किरकोळे, नंदकुमार कामथे, एकनाथ कामथे, संतोष कामथे, उत्तम कामथे, बबन कामथे, सुदाम कामथे, संजय कामथे, संदीप कामथे, राजू मुलाणी, शिवाजी कामथे, वसंत कामथे, दत्तात्रय कामथे, कैलास खळदकर, यशवंत इभाड, मंगेश कामथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नागरिक नंदकुमार कामथे यांनी चव्हाणवाडी-तेगोटेमाळ रस्ता पाच वर्षांत आश्वासन देऊनही आजपर्यंत पूर्ण झाला नाही, आता तरी तो पूर्ण करा अशी मागणी केली. जालिंदर काळे यांनी सूत्रसंचालन, तर अमित कामथे यांनी प्रास्ताविक तसेच नीलेश कामथे यांनी आभार मानले. (वार्ताहर)