शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘छत्रपती’साठी ८० टक्के मतदान

By admin | Updated: April 25, 2015 22:56 IST

येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २५) सरासरी ८० टक्के मतदान झाले,

बारामती : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २५) सरासरी ८० टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी दिली. उशिरापर्यंत मतदानाची आकडेवारी घेण्याचे काम सुरू होते. या दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही. दुपारी ४ नंतर मतदानासाठी गर्दी झाल्याचे चित्र होते.सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली. ढेकळवाडी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, आशादेवी पवार आदींनी मतदान केले. तर आमदार दत्तात्रय भरणे यांनी अंथुर्णे येथील मतदान केंद्रावर मतदान केले. शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांनी लासुर्णे येथे मतदान केले. सकाळी आठच्या सुमारास मतदारांची तुरळक गर्दी होती. मोठ्या प्रमाणात मतदार मतदान केंद्रावर दाखल झाले होते. मात्र, दुपारच्या सुमारास उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदानाचा वेग मंदावला होता. एका मतदाराला दहा मतपत्रिकांवर शिक्का मारावा लागत असल्याने वेळ लागत होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण २१ हजार ४७५ सभासद या कारखान्याचे मतदार आहेत. त्यापैकी १७ हजार ८७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीपासूनच विरोधकांमध्ये एकमत नसल्याने चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांसाठी मतदान होत आहे. त्याचबरोबर निवडणुकीत चुरसदेखील नसल्याचे चित्र आहे. मतमोजणी सोमवारी (दि. २७ एप्रिल रोजी) बारामती एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. दरम्यान मतदान करण्यासाठी वापरण्यात येणारे रबरी शिक्के पुसटसे उमटत असल्याची काही ठिकाणी तक्र ार होती. या शिक्क्यांवरील प्लॅस्टिक कागद न काढल्याने काही ठिकाणी ही किरकोळ समस्या निर्माण झाली होती.४डोर्लेवाडी : डोर्लेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, ढेकळवाडी, पिंपळी, लिमटेक या गावांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले. झारगडवाडीमध्ये एकूण ८३.५५ टक्के, डोर्लेवाडीमध्ये ७८ टक्के, तर सोनगावमध्ये ७९.५५ टक्के, ढेकळवाडी ८१.७० टक्के, पिंपळी ८२ टक्के, लिमटेक ८०.५४ टक्के, काटेवाडीत ८४ टक्के मतदान झाले.४कळंब : कळंबमध्ये सभासद संख्या ३२९ इतकी आहे. यामुळे प्रथमच कळंबमध्ये मतदान केंद्र सभासदांच्या सोयीसाठी ठेवण्यात आले होते. मतदानास सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. कळंब येथे ८१.४५ टक्के मतदान झाले.