पिंपरी : सराफाचे आठ लाखांचे हिरे असलेली बॅग प्रवासी बसमधून चोरट्याने लंपास केल्याची घटना ताथवडे येथे गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोलकुमार पारेख (वय ५२, रा. मुंबई) हे सराफ व्यापारी हैदराबादला हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी गेले होते. पैलू पाडल्यानंतर हिरे घेऊन हैदराबाद येथून एका प्रवासी बसमधून मुंबईला येत होते. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बस चहा-नाष्ट्यासाठी ताथवडे हॉटेलवर थांबली. त्या वेळी पारेख हे नाष्टा करण्यासाठी खाली उतरले. असता अज्ञात चोरट्याने पारेख यांची बसमधील हिऱ्यांची बॅग लंपास केली. पारेख बसमध्ये आल्यावर त्यांना हिऱ्यांची बॅग नसल्याचे लक्षात आले. याबाबत पारेख यांनी बसचालकांसह इतर प्रवाशांकडे चौकशी केली. मात्र, तरीही बॅगचा तपास लागला नाही. बॅगमध्ये ६ लाख ७८ हजार ८६० रुपयांचे हिरे होते. (प्रतिनिधी)
प्रवासी बसमधून आठ लाखांचे हिरे लंपास
By admin | Updated: January 8, 2016 01:36 IST