पुणे - या वसाहतीत एकूण ११ इमारती असून, प्रत्येक इमारतीत १६ सदनिका आहेत. १ ते ३ या दोन तासांत आठ सदनिकांवर चोरट्यांनी डल्ला मारला. शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वसाहतीत एकही सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने चोरट्यांबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. पिंपरी / नेहरुनगर : मध्यरात्रीची वेळ.., इमारतीबाहेरील विद्युतपुरवठा खंडित झालेला.., सुरक्षारक्षकाचा पत्ता नाही.. सलग सुट्यांमुळे बाहेरगावी गेलेले रहिवासी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवत चोरट्यांनी आठ सदनिका फोडल्या. पिंपरीतील अजमेरा कॉलनीतील डब्ल्यू सेक्टरमधील शासकीय वसाहतीत रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत रहिवासी सुनीता अब्दुल अजिज (वय ३७) फिर्याद दिली आहे. सुनीता या वसाहतीतील ४ क्रमांकाच्या इमारतीत वास्तव्यास आहेत. शनिवारी त्या पुण्यात नातेवाइकाकडे गेल्या होत्या. त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यान, रविवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणार्या मंगल सावंत यांनी अजिज यांना फोन करून चोरी झाल्याचे त्यांना सांगितले. कळविल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी सोने व चांदीचे विविध प्रकारचे दागिने व रोकड असा ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले. अजिज यांच्यासह उमेश दिनकर शिंदे (वय २३), मुकुंदा अर्जुन सरपे (वय ४0), दीपक रंगनाथ सुळ (वय २८), हनुमंत के. पाटोळे (वय ५२), गुजर संजय एन., अँड. कांबळे, प्रदीप बाबूराव जगताप यांच्या सदनिकाही चोरट्यांनी फोडल्याचे सकाळी उशिरा उघडकीस आले. अनेक रहिवासी बाहेरगावी असल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला आहेयाबाबत पोलिसांना माहिती मिळाली नाही. (प्रतिनिधी)
अजमेरात ८ घरे फोडली
By admin | Updated: August 18, 2014 05:22 IST