शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशासाठी ७८ हजार विद्यार्थी पात्र

By admin | Updated: June 30, 2017 04:03 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यलायातील अकरावी प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यलायातील अकरावी प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत ७८ हजार २१८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज भरून पूर्ण केला आहे. त्यामुळे केवळ आॅनलाईन अर्ज भरलेल्या या विद्यार्थ्यांनाच प्रवेश फेऱ्यांमधून प्रवेश दिले जातील. तसेच, आॅफलाईन पद्धतीने प्रवेश देणाऱ्या संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यंदा अकरावीची प्रवेश क्षमता वाढली असून, तब्बल ९४ हजार जागांसाठी केवळ ७८ हजार २१८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत लिंक सुरू ठेवली जाणार असल्याने त्यात सुमारे १५० ते २०० विद्यार्थी वाढण्याची शक्यता आहे. आॅनलाईन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती राज्य मंडळाला कळवली जाणार आहे. त्यामुळे आॅफलाईन पद्धतीने प्रवेश घणाऱ्या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होता येणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेनुसारच प्रवेश दिला जाईल, असे सहायक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.राऊत म्हणाल्या, ‘‘आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार येत्या ३० जून ते ३ जुलै या कालावधीत कोट्यातील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे आवश्यकआहे. तसेच, येत्या ४ जुलै रोजी प्रवेश अर्ज पूर्ण भरून सबमीट केलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर विद्यार्थ्यांच्या हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. ७ जुलै रोजी हरकतींच्या दुरुस्तीसह यादी प्रसिद्ध केली जाईल.पहिली गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी ७ जुलै ते ९ जुलैपर्यंत कालावधी दिला जाईल. त्यानंतर १० जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. अकरावी प्रवेशासाठी चार फेऱ्या घेतल्या जाणार आहेत.