यासाठी एस. एम. जोशी हॉस्पिटल व सुरेंद्र आनंद मेमोरियल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने खडकीत जिजामाता कोविड सेंटर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परवानगीने सुरू करण्यात आले आहे. खडकी बाजार येथे गेल्या आठ दिवसांपासून हे कोविड केअर सेंटर सुरू असून, यामध्ये ७६ बेड ठेवण्यात आले असून, येथे २२ रुग्ण उपचार घेत आहेत.
फाउंडेशनतर्फे रुग्णांना दोन वेळा जेवण, नाष्टा, चहा तसेच डॉक्टर, परिचारिका व रुग्णसेवक, सेविका ठेवण्यात आले असून सकाळ, दुपार व संध्याकाळ तीन वेळा रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टर येत असतात. अतिशय चांगल्या पद्धतीने याठिकाणी रुग्णांची शुश्रूषा करण्यात येत आहे. डॉक्टर सुभाष औटी हे स्वतः रुग्णांची देखभाल करत असून सुरेंद्र आनंद मेमोरियल फाउंडेशनचे मनीष आनंद व त्यांच्या पत्नी पूजा आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ही रुग्ण सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. रुग्णांसाठी जेवण ही पुण्यातील सुप्रसिद्ध शहाजी पराठा व ढाबा एन एच ३७ येथून फाउंडेशन तर्फे मोफत पुरविले जात असून फाउंडेशनचे कार्यकर्ते ही सेवा देत आहेत. त्यामुळे या जिजामाता कोविड केअर सेंटर अल्पावधीतच खडकीत प्रसिद्ध झाले आहे.