शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या रिंगणातून ७५१ जणांची माघार

By admin | Updated: February 8, 2017 03:31 IST

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या २६६४ उमेदवारांपैकी ७५१ जणांनी माघार घेतली, तर ४१८ जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत.

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या २६६४ उमेदवारांपैकी ७५१ जणांनी माघार घेतली, तर ४१८ जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. त्यामुळे आता १६२ जागांसाठी १०७६ उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या विरोधात बंडखोरी केलेल्या अनेकांना उमेदवारी मागे घेण्यास लावून त्यांचे बंड शमविण्यात राजकीय पक्षांना यश आले आहे. मात्र काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे.बंडखोरी रोखण्यासाठी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे यांसह सर्वच पक्षांकडून प्रयत्न करण्यात येत होते. काही ठिकाणी त्याला यश आले तर काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे. प्रभाग ३२ मध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने तर प्रभाग ९ मधील मनसेच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतली. बंडखोरांना पक्षामध्ये विविध पदांची आमिषे दाखविण्यापासून ते काही ठिकाणी ‘अर्थपूर्ण’रीत्या समजूत घालण्याचे प्रकारही झाले. वरिष्ठ नेत्यांना फोन लावून देऊन समजूत घालण्याचा प्रयत्न गेल्या दोन दिवसांपासून होत होता. त्याला अनेक ठिकाणी यश मिळाले. यंदाची निवडणूक ही प्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे अपक्षांना निवडणूक लढविणे जड जाणार आहे. त्याचे प्रत्यंतर माघारीमध्ये झाले. मात्र, तरीही काही अपक्षांनी पक्षाविरुद्धचा राग व्यक्त करण्यासाठी उमेदवारी अर्ज भरले होते. राजकीय चुरस मोठी असल्याने अगदी थोडक्या मतांनीही निकाल बदलू शकतो. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज ठेवू नयेत, यासाठी प्रयत्न झाले. (प्रतिनिधी)