शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणासाठी ७४ हजार तास विनामूल्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 04:11 IST

सामाजिक क्षेत्रामध्ये ३२ वर्षांपासून अधिक काळ काम करीत असलेल्या भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) आजवर २० पेक्षा अधिक नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतकार्य उभे केले आहे. शैक्षणिक कार्यातही संघटनेचे मोठे योगदान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सामाजिक क्षेत्रामध्ये ३२ वर्षांपासून अधिक काळ काम करीत असलेल्या भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) आजवर २० पेक्षा अधिक नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतकार्य उभे केले आहे. शैक्षणिक कार्यातही संघटनेचे मोठे योगदान आहे. ‘पानी फाउंडेशन’च्या वॉटर कप स्पर्धेचे वेगळेपण लक्षात घेऊन विविध गावांमध्ये जेसीबी, पोकलेनसह आवश्यक मशीनरी पुरवण्यात आली. जवळपास ७३ हजार ६९८ तास ही विनामूल्य सेवा पुरविण्यात आली, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी दिली.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये रविवारी बीजेएसने केलेल्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले. बक्षीस विजेत्या गावांसह जलसंधारणाच्या कामामध्ये सहभाग घेणाऱ्या संस्थांचाही सत्कार करण्यात आला. मुथ्था म्हणाले, भारतीय जैन संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची एक हजार मुले दत्तक घेतली आहेत. या मुलांनीही श्रमदान करुन पाणी बचतीचा संदेश दिला आहे. लातुर-किल्लारीला झालेल्या भूकंपात मातापित्यांचे छत्र गमावलेल्या बाराशे मुलांचा सांभाळ संस्थेने केला. वॉटर कपचे काम वेगळे आहे. आमिर खान आणि सत्यजीत भटकळ यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. जी गावे आपले उद्दिष्ट पूर्ण करतील त्यांना मशीनरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. काही भागात परराज्यातून मशीनरी आणण्यात आली. संघटनेचे ६०० कार्यकर्ते सहभागी झाले होते.