बारामती : बारामती शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात व्यवसाय कराचा ७३ लाख ७६ हजार रुपयांचा अपहार झाला आहे. २०१० ते २०१२ दरम्यान हा अपहार झाला आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी शुक्रवारी (दि. ९) बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर कार्यालयाच्या चौघां निवृत्त कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भांगे (कनिष्ठ लेखा परीक्षक, रा. पुणे), तापकीर (कनिष्ठ लेखा परीक्षक, रा. पुणे), गोगावले (कनिष्ठ लिपिक, रा. पुणे), खुळे (कनिष्ठ लिपिक रा. सोलापूर) या निवृत्त कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०१० ते २०१२ दरम्यान शासनाच्या खात्यावर न भरता अपहार केला. (वार्ताहर)
बारामतीत ७३ लाखांचा अपहार
By admin | Updated: January 9, 2015 23:18 IST