शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधून अकरावीसाठी ७१ हजार अर्ज

By admin | Updated: June 18, 2016 03:28 IST

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे ७१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

पुणे : केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे ७१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. रात्री उशिरापर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने अर्जांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे माहिती केंद्रीय प्रवेश समितीने स्पष्ट केले. इयत्ता अकरावीच्या सुमारे ७४ हजार जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेश अर्जाचे दोन्ही भाग भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७१ हजार २५८ एवढी होती. प्रत्यक्षात आॅनलाइन अर्जासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा तब्बल ८३ हजार ४८१ एवढा आहे, तर त्यापैकी ७७ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरलेला आहे. शुक्रवारी साडेपाच वाजेपर्यंत अर्जाचा पहिला भाग भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५ ते ६ हजार विद्यार्थ्यांनी दुसरा भाग भरलेला नव्हता. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश समितीने रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेशाची आॅनलाइन लिंक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकूण प्रवेश अर्जांची संख्या वाढू शकते. शुक्रवारी अर्ज अंतिम करण्याची अखेरची संधी होती. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. केंद्रीय प्रवेशप्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी २७ जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे; तसेच व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक आणि शाळांतर्गत कोटा प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १८ जून असणार आहे. सर्व तीनही कोट्यातील प्रवेशांसाठीची पहिली गुणवत्ता यादी २१ व २२ जूनला प्रसिद्ध होईल.विविध महाविद्यालयांनी अल्पसंख्याक, शाळांतर्गत आणि व्यवस्थापन कोट्यातील 1442प्रवेश केंद्रीय समितीकडे सरेंडर केले आहेत. त्यामुळे प्रवेशक्षमता वाढली आहे. 71258सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेश अर्जाचे दोन्ही भाग भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या77521विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला आहे. अकरावीच्या ७४ हजार जागांसाठी आॅनलाइन प्रक्रिया