शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७१ लाखांचा मदतनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:09 IST

लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील ५७ गावांतील २ हजार ५०० शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ७१ लाखांचा नुकसानभरपाईचा मदतनिधी पदभार स्वीकारल्यानंतर ...

लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील ५७ गावांतील २ हजार ५०० शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ७१ लाखांचा नुकसानभरपाईचा मदतनिधी पदभार स्वीकारल्यानंतर पंधरवड्यात दिल्याची माहिती हवेलीच्या नवनियुक्त तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली. जून २०२० ते ऑक्टोबर २०२० या काळातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची वेगवेगळ्या टप्प्यांतील ही भरपाई होती.

कोलते म्हणाल्या, नागरिकांची कामांसाठी अडवणूक होऊ नये तसेच त्यांना हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून हवेलीत झिरो पेन्डन्सी राबवणार आहे. जुनी प्रकरणे अवलोकन करून त्यावर तातडीने निर्णय घेणार असून, नवीन प्रकरणे तातडीने निर्गत करण्यासाठी नावीन्यपूर्ण संगणक प्रणाली अवलंबणार असून, त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. चूक दुरुस्तीची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा कलम १५५ ची प्रकरणे, एनएची प्रकरणे त्याचबरोबर आरटीएस टेबलची काही प्रकरणे यासाठी झिरो पेन्डन्सी राबवून प्रकरणे निर्गत करणेकामी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते आदेश दिलेले आहेत.

कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावून जुन्या कागदपत्रांचे जतन करून कार्यालयीन स्वच्छतेवर भर दिला आहे. कार्यालयात आलेल्या पत्रास विहित मुदतीत उत्तर देऊन काम तातडीने मार्गी लावण्याचा मानस असल्याची माहिती तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली.

शिंदवणे येथे शेतकऱ्यांना मदतीचा धनादेश

उरुळीकांचन : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले खाते नंबर महसूल किंवा कृषी खात्याकडे दिले नव्हते. त्यांना मदतीचा धनादेश देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन शिंदवणे येथे केले होते. या वेळी आमदार अशोक पवार, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, सरपंच मनीषा अण्णासाहेब महाडिक, माजी सरपंच गणेश महाडिक, अण्णासाहेब महाडिक, मंडल अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी प्रदीप जवळकर, निवृत्ती गवारे, अर्चना वनवे, कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी जी. के. कडलग, कृषी सहायक एस. एम. चव्हाण, राजेंद्र भोसेकर ग्रामविकास अधिकारी डी. आर. पोटे उपस्थित होते.

मागील वर्षी ढगफुटी व अतिवृष्टीमुळे हवेली तालुक्‍यातील शिंदवणे व वळती गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यासाठी नुकसानभरपाई म्हणून शासनाने सुमारे ४० लाखांची मदत या भागातील शेतकऱ्यांना दिली आहे. यामधील शिंदवणे गावातील शेतकऱ्यांचे १० लाख २६ हजार तसेच वळती गावातील शेतकऱ्यांचे २० लाख २१ हजार १०० रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले, तर उरलेल्या ९ लाख २२ हजार रुपयांचे धनादेश तयार करून तलाठ्यांना दिले आहेत. शनिवारी पाच शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण केले.

२८ उरुळी कांचन