शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस ७०० वाहने १५ दिवसांत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:18 IST

शहरात विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बंद पडलेली तब्बल ७०० बेवारस वाहने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंधरा दिवसांत जप्त केली आहेत.

पुणे : शहरात विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बंद पडलेली तब्बल ७०० बेवारस वाहने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंधरा दिवसांत जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक ३७१ दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यानंतर लिलाव करून सर्व वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुनी तब्बल एक लाखांपेक्षा अधिक दुचाकी व चारचाकी वाहने सध्या शहरामध्ये आहेत. आरटीओच्या नियमानुसार संबंधित वाहनमालकांनी सर्व वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. परंतु, ते स्क्रॅप न करता शहरातील सार्वजनिक जागांमध्ये, घराबाहेर रस्त्यांवर वाहने सोडण्यात आली आहेत. यामध्ये अनेक वाहनमालकांकडे वाहन स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने बेवारसपणे सोडण्यात येत असल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर अभियानातंर्गत या बेवारस वाहनांबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या आहेत. शहरामध्ये हजारो बेवारस वाहने रस्त्यांवर गेली अनेक वर्षे पडून असल्याचे पाहणीमध्ये समोर आले. परंतु पालिका प्रशासनाकडे उचलेली वाहने कुठे टाकायची, असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर होता. तसेच एवढी वाहने उचलण्यासाठी आवश्यक क्रेन व अन्य यंत्रणादेखील पालिकेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे बºयाच कालावधीपासून सार्वजनिक जागांवर आणि रस्त्यांवर बंद अवस्थेत पडून असलेली ही वाहने वाहतुकीसाठी अडथळे ठरत आहेत. त्यातच या वाहनाच्या वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या वाहनामुळे रस्त्यावर होत असलेल्या वाहतूककोंडीची वेगळीच समस्या आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु स्वच्छ शहर अभियानामध्ये यामुळे महापालिकेच्या गुणकांवर परिणाम होत असल्याने या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली.दंड भरून सोडविता येणार आपले वाहनया कारवाईत जप्त केलेल्या गाड्या घेऊन जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. यामध्ये दोनचाकी गाड्यांसाठी १ हजार रुपये, तीनचाकीसाठी १0 हजार रुपये, चारचाकीसाठी १५ हजार रुपये, सहाचाकीसाठी २0 हजार रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या गाड्यांसाठी २५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला असून, त्यानंतर या गाड्यांचा नियमानुसार लिलाव केला जाईल. ज्यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळू शकणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.>कारवाईत जप्त केलेली वाहनेशहराच्या विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बेवारस पडलेली सुमारे ७०० वाहने प्रशासनाने जप्त केली आहेत. यामध्ये ३७१ दुचाकी गाड्या, ६६ तीनचाकी गाड्या, २५५ चारचाकी आणि अन्य वाहनांचा समावेश आहे. या सर्व वाहनांचा एका महिन्यात लिलाव करून स्कॅ्रपमध्ये काढण्यात येणार आहे. तसेच ही मोहीम पुढेदेखील सुरु ठेवण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख माधव जगताप यांनी स्पष्ट केले.