शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वीस गुंठ्यांत घेतला ७० टन ऊस , बोरी बुद्रुकमध्ये प्रयोग : खर्च वजा जाता दीड लाख रुपयांचा नफा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 02:52 IST

बोरी बुद्रुक येथील संपत बबन कोरडे या तरुण शेतकºयाने २० गुठ्यांत २६५ या उसाच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यातून चांगल्या प्रकारचा नफा मिळवला आहे.

- राजेश कणसे  राजुरी : बोरी बुद्रुक येथील संपत बबन कोरडे या तरुण शेतकºयाने २० गुठ्यांत २६५ या उसाच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यातून चांगल्या प्रकारचा नफा मिळवला आहे.एका उसाला २० ते २५ टिपरे असतात. परंतु कोरडे यांनी घेतलेल्या एका उसाला साधारण ३०-३५ टिपरे आली आहेत. त्यांची चांगल्या वाढ देखील झाली असून, वजन देखील चांगले भरत आहे. आतापर्यंत विघ्नहर साखर कारखाना क्षेत्रामध्ये ऊस असलेल्या शेतकºयांनी एकरी शंभर टन ऊस काढला आहे. परंतु कोरडे यांनी अवघ्या वीस गुंठ्यांत (अर्धा एकर) सत्तर ते पंच्चाहत्तर टन उसाचे उत्पादन अवघ्या दहा महिन्यातच काढले आहे. कारण उसाच्या एका पिकाला साधारन पंधरा ते सोळा महिने लागत असतात. या पिकातून त्यांना खर्च वजा जाता दीड लाख रूपयांचा नफा मिळणार आहे. कृषीतज्ज्ञ रूपेश डेरे, विघ्नहर साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी गोपिनाथ औटी, संदीप जाधव, महादू जाधव यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) संपत बबन कोरडे या तरूणाचे शिक्षण अ‍ॅग्री डिप्लोमा झाले आहे. त्यांना नोकरीतून चांगला पगार मिळत असून, केवळ शेतीची आवड असल्याने या नोकरीवर पाणी सोडले वे शेती करू लागले. त्यांनी गावातील चारंगबाबा सेवा ट्रस्टची असलेली जमीन तीन वर्षांसाठी खंडाने घेतली.यामध्ये कोरडे यांनी २० गुठ्यांत ऊस लावण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी सरूवातीला ताग पेरला. नंतर हा ताग तीन महिन्यानंतर मोठा झाल्यावर गाडून टाकला.चार ट्रॉली शेणखत पांगवले हा ताग गाडल्यानंतर टॅक्टरने साडेचार फुटाची सरी काढली. त्यात दोन फुटाच्या अंतरावर एक डोळा पध्दत २६५ या जातीच्या वानाची उसाची लागवड केली. संपूर्ण २० गुठांच्या क्षेत्राला ठिबक पध्दतीने पाणी दिले. तसेच महिना झाल्यानंतर सरी फोडून उसाच्या बुडकापाशी चांगल्या प्रकारे माती लावली. तसेच त्यांनी यासाठी शेणखत पोटॅश १८४६ ही खते वापरली.ऊस लागवडीपासून आतापर्यंत जवळपास फक्त ३६ हजाररुपये खर्च आलेला आहे. विशेष म्हणजे त्यांनी अतिशय कमी दिवसांत म्हणजे फक्त दहा महिण्यातच हा ऊस तुटायला आला आहे.