शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

भिगवणला दरोडेखोर महिलेसह ७ जण जेरबंद

By admin | Updated: September 20, 2015 00:09 IST

पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या तयारीत असलेल्या महिलेसह ७ दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. चोरी करण्याच्या साहित्यासह सुमो गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

भिगवण : पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या तयारीत असलेल्या महिलेसह ७ दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. चोरी करण्याच्या साहित्यासह सुमो गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. भिगवण पोलिसांकडून झालेल्या कारवाईची परिसरात चर्चा होती. बेळ्या काळे (वय ३९), मिथुन पवार (वय २२), नंद्या उर्फ लांड्या सूल्या पवार (वय २४), सचिन काळे (वय २५), सलीम शेख (वय ३२, सर्व जण रा. जवळफाटा, ता. जामखेड, जि. अहमदनगर), आयाज शेख (वय २५, रा. नुरानी कॉलनी, जामखेड), अबिती पवार (वय २५, रा. घोडेगाव, ता. जामखेड) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील पहिले तिघे जण अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर इतर पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना भिगवण-राशीन रस्त्यावर पोलिसांना संशयित वाहन आढळले. त्यांची चौकशी केली असता चोरट्यांनी वाहनातून उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडे चोरी करण्यास उपयोगी पडणारे साहित्य मिळून आले. यामध्ये एक तलवार, दोन चाकू, नायलॉन दोरी, मिरची पूडचा समावेश होता. तसेच सुमो गाडीसह अंदाजे चार लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.