शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

भोर तालुक्यात ६७ टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 02:07 IST

भोर तालुक्यातील २२२ मतदान केंद्रांपैकी ६ केंद्रांतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे २१६ केंद्रांवरच मतदान

भोर : भोर तालुक्यातील २२२ मतदान केंद्रांपैकी ६ केंद्रांतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे २१६ केंद्रांवरच मतदान झाले. तालुक्यातील सर्व केंद्रांवर सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत १२ टक्के, ९.३० ते ११.३० पर्यंत २७ टक्के, ११.३० ते १.३० पर्यंत ५१ टक्के आणि ३.३० वाजता ५६ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ६७ टक्के मतदानाचा अंदाज आहे. वीसगावमधील नेरे, खानापूर, बाजारवाडी, बालवडी, हातनोशी, उत्रौली, तर कर्नावड, आंबवडे, रायरी, भोलावडे, हातवे, किकवी या गावात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. निवडणुकीत कोणताच अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नसरापूर, भोलावडे, केळवडे, हातवे, उत्रौली, नेरे, बालवडी, किकवी या गावात अधिक प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाटघर धरण भागात नागरी सुविधा झाल्या नसल्याने पाच गावांतील १३३० मतदारांनी मतदान केले नाही. भुतोंडे मतदान केंद्रावर (०), खुलशी (०), गृहिणी (०), चांदावणे (०), कुंबळे व बोपे (०) टक्के मतदान झाले. या भागातील फक्त डेरे गावात ९५ मतदान झाले. येथील खिळदेववाडीने मतदान केले नाही. आदिवासी महादेव कोळी समाजाने  विविध मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तहसीलदार वर्षा  शिंगण, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी कारी, कोळेवाडीत जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. परंतु मतदारांनी मतदान केले नाही. धानवली गावातील मतदान केंद्रावर (०), तर कारी कोळेवाडी सांगवी वे. खो, नांदघुर  पसुरे जयतपाड या गावात महादेव कोळी समाजाच्या लोकांनी मतदानात भाग घेतला नाही. सुमारे ४५० मतदारांनी बहिष्कार टाकला. (वार्ताहर)