शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरमध्ये ६४ व्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:47 IST

इंदापूर शहरात डॉ. कदम गुरुकुल इंदापूर व सीबीएसई व बीएसजीडब्लूएस भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ६४वी राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन इंदापूर येथील कदम गुरुकुल येथे करण्यात आले होते.

इंदापूर : शहरात डॉ. कदम गुरुकुल इंदापूर व सीबीएसई व बीएसजीडब्लूएस भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ६४वी राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा कदम गुरुकुल येथे सुरू आहे. या स्पर्धेचा मुलांचा अंतिम सामना महाराष्ट्र आणि सीबीएसई या दोन संघामध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी सकाळी रंगला होता. मात्र, त्यामध्ये पंचांनी सीबीएसईला ६ बेस, ६ फ्री दिले. त्यानंतर मग महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंनी मध्येच सामना थांबवून पंचांना बदलण्याची विनंती केली. त्यानंतर मग दोन्ही संघात हमरीतुमरी झाली. यामुळे मध्येच सामना १ ते २ तास थांबला. या वेळी क्रीडा अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वाद टळला. मात्र हा सगळा खटाटोप सीबीएसई संघाला जिंकून आणण्यासाठी होता, असा आरोप पुणे विभागाचे उपसंचालक अनिल चोरमले यांनी केला आहे. या वादामुळे मात्र, या स्पर्धेला गालबोट लागले.

इंदापूर शहरात डॉ. कदम गुरुकुल इंदापूर व सीबीएसई व बीएसजीडब्लूएस भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ६४वी राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन इंदापूर येथील कदम गुरुकुल येथे करण्यात आले होते. तालुका क्रीडा संकुलावर मैदान नसल्याने मुलांच्या स्पर्धा इंदापूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या, तर मुलींच्या स्पर्धा डॉ. कदम गुरुकुल मैदानावर घेण्यात आल्या. या स्पर्धा मागील पाच दिवसांपासून सुरू आहेत. या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटाखालील मुले व मुलींचे जवळपास १६ संघ देशभरातून सहभागी झाले होते.

रविवारी महाराष्ट्र आणि सीबीएसई या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगला. कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर हा सामना सुरू होता. या सामन्यादरम्यान पंचांनी सीबीएसई ला ६ बेस, ६ फ्री दिले. त्यानंतर महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंनी मध्येच सामना थांबवून पंचांना बदलण्याची विनंती केली. त्यानंतर मग दोन्ही संघांत वाद निर्माण झाला. यामुळे सामना काही काळ थांबविण्यात आला. दोन्ही संघांतील वाद कमी करण्यासाठी क्रीडा अधिकाºयांनी मध्यस्थी केली. मात्र हा सगळा खटाटोप सीबीएसई संघाला जिंकून आणण्यासाठी होता असा आरोप पुणे विभागाचे उपसंचालक अनिल चोरमले यांनी केला. एकाच वेळी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे आणि मुलांच्या संघाचे सामने चालू करण्यात आले. कारण दिशाभूल करण्याचा नियोजन कमिटीचा डाव होता. या सर्व प्रकराबद्दल तक्रार महाराष्ट्र बेसबॉल संघाचे व्यवस्थापक अशोक सरोदे यांनी स्कूल गेम फेडरेशनला केली असल्याचेही अनिल चोरमले यांनी सांगितले. या वेळी महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंना वादावादीबाबत विचारणा केली असता, त्यांनी याबद्दल बोलण्यास स्पष्ट नकार दिला.नियोजनाचा अभावतीन दिवसांत मैदानावरील परिस्थिती पाहिली असता, बेसबॉल मैदानावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. ४५० खेळाडूंना पिण्यासाठी केवळ दोन वीस लिटरचे जार, निकृष्ट दर्जाचे बेसबॉल मैदान दिसून आले. त्यावरील वाळलेले गवतदेखील काढण्यात आलेले नव्हते. राष्ट्रीय स्पर्धा अशा मैदानावर खेळवल्या जातात का? असा सवाल क्रीडाप्रेमींमधून विचारला जाऊ लागला आहे. राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन, मात्र त्याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी बोलावण्यात आला नव्हता. हा सर्व नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून येत होते.महाराष्ट्रातील त्या सोळा खेळाडूंच्या भवितव्याचे काय?ही राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या संघातील त्या सोळा खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी या प्रमाणपत्राचा उपयोग झाला असता, मात्र तो संघ अंतिम सामन्यात उपविजेता ठरल्याने त्यांना शासकीय नोकरीत राखीव जागा मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही.