शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

आयुक्तांमुळे रखडली ६०० कोटींची कामे

By admin | Updated: April 21, 2017 06:07 IST

महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्यामुळे शहरातील ६00 कोटींची कामे रखडली असून, शहराच्या विकासाला त्यामुळे खीळ बसत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी

पुणे : महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्यामुळे शहरातील ६00 कोटींची कामे रखडली असून, शहराच्या विकासाला त्यामुळे खीळ बसत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. खोदाईसंदर्भात राज्यातील सर्व पालिकांना महावितरणने एक प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला पुणे वगळता सर्व पालिकांच्या आयुक्तांनी प्रतिसाद दिला मात्र, पुण्याच्या आयुक्तांनी अद्यापही त्यावर कोणतीच भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यामध्ये जवळपास १ हजार २६० कोटींची कामे सुरु आहेत. विविध योजनांमधून जवळपास ८00 कोटींची कामे पूर्ण झाली असून अद्याप ४00 कोटींची कामे शिल्लक आहेत. शहरातील केबल्स भूमिगत करणे, शेतकऱ्यांना नवीन केव्ही उभे करून देणे, शहरामध्ये अक्षय वीज देणे नवीन केव्ही सेंटर्स उभी करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. महावितरणच्या केबल्स भूमिगत करण्यासाठी शहरांमध्ये खोदाई करावी लागते. त्यासाठी सर्व पालिकांना एक प्रस्ताव तयार करुन देण्यात आला होता. ‘महावितरण स्वत:च खोदाई करणार, काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वी जसा होता तसा रस्ता पूर्ववत तयार करुन देणार, त्यानंतर पालिकेने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यावरच संबंधित ठेकेदाराला बिल अदा केले जाईल. यासंपूर्ण कामाचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाईल.’ असा तो प्रस्ताव होता. या प्रस्तावाला राज्यातील सर्व पालिकांनी स्वीकारले. मात्र, पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी कोणतेही सहकार्य केले नाही.