शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पीडीसीसी बँकेवरील दरोड्यात ६५ लाख लंपास

By admin | Updated: September 11, 2016 01:02 IST

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राहू शाखेवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून ६५ लाख ५७ हजारांची रोकड लंपास केली.

राहू : राहू (ता. दौंड) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राहू शाखेवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून ६५ लाख ५७ हजारांची रोकड लंपास केली. या वेळी राहू सोसायटीचे सुरक्षारक्षक उत्तम वाघ यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच बँकेचे सुरक्षारक्षक दीपक भालेराव यांनादेखील दरोडेखोरांनी मारहाण केली. दोन्ही सुरक्षारक्षकांचे हात-पाय बांधून त्यांना खांबाला बांधले होते. राहू सोसायटीची इमारत गावापासून काहीशा अंतरावर आहे. या सोसायटीच्या इमारतींमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. आज मध्यरात्रीच्या सुमारास ४ दरोडेखोर तोंडाला मास्क लावून आले. सर्वप्रथम त्यांनी दोन्ही सुरक्षारक्षकांना मारहाण करून खांबाला बांधले. त्यानंतर बँकेच्या मागील खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. बँकेतील सायरनची केबल तोडून गॅस कटरच्या साहाय्याने स्ट्राँग रूम आणि तिजोरी तोडून रक्कम लंपाास केली. साधारणत: तीन तासांच्या कालावधीत दरोडेखोरांनी बँक फोडून लूटमार केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, गुन्हे अन्वेषण विभागाचे राम जाधव, ग्रामीण सहायक अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण घटनास्थळी उपस्थित होते.