पुणे : रोस्टर मंजुरीच्या प्रक्रियेस विलंब होत असल्यामुळे राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील तब्बल ५ हजार ७०० जागा रिक्त आहेत. त्यामुळे शासनाने रोस्टर मंजुरीचा प्रश्न लवकर सोडवावा, असा पत्रव्यवहार उच्च शिक्षण संचालनलायातर्फे करण्यात आला आहे.शासनाच्या मागासवर्गीय आरक्षण कक्षाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले रोस्टर परत पाठविली जात आहेत. मराठा, मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी की नाही, यासंदर्भातील निर्णय शासनाने अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेचा प्रश्न रखडलेला आहे. तसेच न्यायालयातही याबाबत याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रियेसंदर्भात तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा महाविद्यालय प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
प्राध्यापकांच्या ५७०० जागा रिक्त
By admin | Updated: December 17, 2014 05:28 IST