शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठात ५६ वर्षीय विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी! एम. ए. मराठी विषयासाठी मिळवली ४ सुवर्णपदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम. ए. मराठीसाठी चक्क ५६ वर्षीय विद्यार्थिनीला चार सुवर्णपदके मिळाली आहेत. कला, साहित्य ...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम. ए. मराठीसाठी चक्क ५६ वर्षीय विद्यार्थिनीला चार सुवर्णपदके मिळाली आहेत. कला, साहित्य आणि लिखाण याची आवड असणाऱ्या पुण्यातील नीलिमा फाटक यांचे सर्वच स्तरावर कौतुक होऊ लागले आहे.

वयाच्या ३० वर्षांपर्यंतच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षणात रस दाखवतात. तसेच, आवर्जून पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतात. त्यांनतर नोकरी, व्यवसायात गुंतल्यावर पुन्हा शिक्षणाकडे शक्यतो वळत नाहीत. पण फाटक यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर बँकेत ३० वर्षे नोकरी करून एम. ए. मराठीला प्रवेश घेतला. त्यामध्ये मन लावून अभ्यास करत चार सुवर्णपदके मिळवण्याची उत्तम कामगिरी करून दाखवली आहे.

नीलिमा फाटक यांनी रामकृष्ण मोरे आर्टस, कॉमर्स आणि सायन्स या महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर वकिलीचे शिक्षणही केले. त्यांना आधीपासूनच कविता लेखन, साहित्य वाचनाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या बँकेत नोकरीसाठी रुजू झाल्या. पण त्यांनी आपले लिखाण, वाचन, कवितालेखन हे छंद थांबवले नाहीत. कामातून वेळ मिळाला की त्या साहित्यात गुंतून जात असत. कविता लिहिण्याचा छंद कधीही थांबू दिला नाही. अखेर त्याचे फळ म्हणून २०१९ साली ‘निलमाधव’ नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. जपानमध्ये १८ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हाच करम व रंगतसंगत प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना पारंपरिक व उच्चशिक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. समाजकार्य म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे संगोपन करत असलेल्या स्नेहवन संस्थेशी त्या संलग्न आहेत.

फाटक म्हणाल्या की, महाविद्यालयीन शिक्षणानंतर बँकेत नोकरीला लागले. पण एम. ए. मराठी करण्याचे ठरवले होते. नोकरीच्या ३० वर्षांमध्ये मराठी साहित्याकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. एका बाजूने लिखाणाचे कार्य सातत्याने चालू होते. त्याचेच फळ म्हणून आता मला पुणे विद्यापीठातून चार सुवर्णपदके मिळाली आहेत. पीएच.डी. करण्याची माझी इच्छा आहे. आताच मी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रवेशही घेतला आहे.

मॉरिशसमधील मराठी अभ्यासक्रमात कविता

तीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी केली. त्यानंतर वयाच्या ५४ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. शालेय जीवनापासूनच मला वाचन आणि कविता लेखनाची आवड होती. महाविद्यालयीन जीवनातही मी लिखाण थांबवले नाही. माझी एक कविता मॉरिशसमधील इयत्ता नववीच्या मराठी अभ्यासक्रमात आहे.

फोटो- नीलिमा फाटक