शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या ५५ बस ‘डब्बा’

By admin | Updated: December 16, 2015 03:23 IST

इंदापूर आगारातील ५ लाख किलोमीटरच्या पुढे ‘रनिंग’ झालेल्या गाड्यांची संख्या ५५ आहे. त्यामुळे बस बंद पडण्याचे सत्र सुरूच आहे.

अंथुर्णे : इंदापूर आगारातील ५ लाख किलोमीटरच्या पुढे ‘रनिंग’ झालेल्या गाड्यांची संख्या ५५ आहे. त्यामुळे बस बंद पडण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी (दि. १४) गोतोंडी येथील ५४ फाट्यानजीक झालेल्या अपघातानंतर इंदापूर आगार प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. मंगळवारी (दि. १५) सकाळी शेळगाव बसस्थानकानजीक व जाचकवस्ती अशा दोन ठिकाणी एसटी बस प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रकार घडल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. सातत्याने घडणाऱ्या या प्रकारांमुळे एसटी बस कर्मचाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. मंगळवारी (दि. १५) सकाळी ११च्या दरम्यान इंदापूर-वालचंदनगर बस (एमएच १२-ई एफ, ६६७०) २५ ते ३० प्रवासी घेऊन वालचंदनगरच्या दिशेने निघाली असता, शेळगाव बस स्थानकानजीक इंजिनातून मोठा आवाज होऊन अचानक बंद पडली. दुपारी अडीचपर्यंत या गाडीच्या दुरुस्तीसाठी आगारामधून कर्मचारी आले नव्हते. इंदापूर-बारामती मार्गावरील जाचकवस्ती येथे बारामती-इंदापूर बस (एमएच १२-६४२१) हीदेखील इंजिनातून मोठा आवाज होऊन बंद पडली. ही घटना दुपारी तीन दरम्यान घडली. या बसमध्ये ५५ प्रवासी होते. अचानक बंद पडलेल्या बसमुळे प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागला. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांमधून तसेच एसटी कर्मचाऱ्यांमधूनही संताप व्यक्त होत आहे. बस आगारामधून बाहेर पडत असताना बसमध्ये काही बिघाड आहे का, याची व्यवस्थित तपासणी होत नसल्याने अशा या घटनांमुळे निदर्शनास येत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच आगार प्रशासन जागे होणार का, असा सवालही केला जात आहे. (वार्ताहर)आगारप्रमुखाचे हात वरकर्मचारीसंख्या कमी असल्याने सेवा देताना अडचणी येत आहेत. आगाराकडे ५ लाख किलोमीटरच्या पुढे ‘रनिंग’ झालेल्या गाड्यांची संख्या ५५ आहे. इंदापूर आगार सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने रोज या ठिकाणी येणाऱ्या इतर आगारांच्या बसना सेवा पुरवावी लागते. परिणामी, आमच्या आगाराच्या बसकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. - एन. एस. मिले, आगार व्यवस्थापक, इंदापूर