केडगाव : पारगाव येथील प्राथमिक शाळा हायटेक झाल्याने इंग्रजी माध्यमासाठी पहिल्याच दिवशी ५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती मुख्याध्यापक रवींद्र पोटे यांनी दिली. या शाळेने नव्याने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. यामध्ये ई-लर्निंग, संगणक, अद्ययावत इमारत, शिक्षक वर्ग, बाक, खेळण्यासाठी मैदान यासारख्या सुविधांची जाहिरात केली. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी अक्षरश: विद्यार्थी व पालकांच्या प्रवेशासाठी रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, इंग्रजी माध्यामाच्या परिसरातील खासगी शाळा सोडून पालकांनी आपल्या या शाळेत घालणे पसंत केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन बोत्रे यांनी सांगितले, की पालकांच्या व ग्रामस्थांच्या आर्थिक सहभागातून शाळेत विविध सुधारणा केल्या जातात. त्यातूनच चालू वर्षी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. (वार्ताहर)
पारगावच्या इंग्रजी शाळेत पहिल्याच दिवशी ५० प्रवेश
By admin | Updated: June 18, 2015 22:47 IST