शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिओमुक्तीचे इनाम ५ रुपये!

By admin | Updated: February 10, 2017 03:18 IST

पल्स पोलिओ मोहिमेच्या कष्टप्रद कामाच्या अवघ्या २० रुपये प्रवासभत्त्यातही १५ रुपयांची कपात करून तो ५ रुपये करण्याचा अजब निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

पुणे : पल्स पोलिओ मोहिमेच्या कष्टप्रद कामाच्या अवघ्या २० रुपये प्रवासभत्त्यातही १५ रुपयांची कपात करून तो ५ रुपये करण्याचा अजब निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या कार्यालयासमोरच अंगणवाडीतार्इंनी ठिय्या दिला. अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. येत्या एप्रिलमधील पोलिओ मोहिमेसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव ठेवू, असे या वेळी डॉ. पाटील म्हणाल्या.अनेक वर्षांच्या पोलिओ निर्मूलनाच्या सातत्यपूर्ण मोहिमेनंतर अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त देश म्हणून जाहीर केले. या यशात लाखो अंगणवाडीताई, आशाताई, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा सिंहाचा वाटा आहे. देशभरात एकाचवेळी एक दिवस बूथवर पोलिओ डोस देण्याची मोहीम वर्षातून दोनदा होते. ती झाल्यावर त्या दिवसानंतर पुढचे ५ दिवस, वरील स्वयंसेवक वाडी-वस्ती, आदिवासी पाडे, झोपडपट्ट्या, बहुमजली इमारती इ. ठिकाणी पायपीट करत बूथवर न आलेल्या ० ते ५ वयोगटातील बालकांचा शोध घेत त्याला घरी जाऊन डोस पाजतात. वर्षानुवर्षे हे काम तळमळीने केल्यानेच देश पोलिओमुक्त झाला. या कामासाठी त्यांना ७५ रुपये मानधन व २० रुपये प्रवासभत्ता मिळत असे. परंतु, नुकत्याच २९ जानेवारीला झालेल्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी या प्रवासभत्त्यात १५ रुपयांची कपात करून तो ५ रुपये करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला होता. त्याविरुद्ध पल्स पोलिओ मोहिमेचे काम करणाऱ्या घटकांमध्ये संतापाची भावना होती. त्याचा परिणाम या आंदोलनात दिसून आला़या वेळी डॉ. पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच पल्स पोलिओ मोहिमेसाठी २०० रुपये मानधन व ५० रुपये प्रवासभत्त्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्पांत कार्यरत अंगणवाडीताई सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांच्या स्वत:च्या मानधनात पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने १५ रुपयांची भर घातली आहे. परंतु, आपल्या ग्रामीण व आदिवासी भगिनींनाही न्याय मिळावा म्हणून त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी शैलजा चौधरी, सुनंदा साळवे,अनिता आवळे, ज्योती गायकवाड, विद्या कुकरेजा, मंदा मोरे आदी पदाधिकारी सहभागी होते.