शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बोपदेव घाटात दरोडा टाकणाऱ्या ५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST

पुणे : दुकान बंद करुन घरी येणार्या दुकानदाराला बोपघाटात अडवून लुबाडणार्या ५ जणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. चेतन संजय ...

पुणे : दुकान बंद करुन घरी येणार्या दुकानदाराला बोपघाटात अडवून लुबाडणार्या ५ जणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली.

चेतन संजय वैराट (वय २२), सुरज विठ्ठल गायकवाड (वय १९, दोघे रा. हिवरे, ता. पुरंदर), रोहीत सुरेश बाबर (वय २१), राजेश सिताराम निघोले (वय २२, दोघे रा. सासवड) आणि जगन्नाथ दत्तात्रय वाघमारे (वय २०, रा. सासवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विकास रोहीदास दरेकर (वय ३५, रा. कोंढवा बुद्रुक) हे त्यांचे हिवरे गाव येथील शेतीचे खत व औषधाचे दुकान बंद करुन २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता घरी येत होते. बोपदेव घाट उतरुन येवलेवाडी येथे आले असताना तीन मोटारसायकलवरुन आलेल्या ८ जणांनी त्यांना अडवले. कोयता, लोंखडी रॉडने मारहाण करुन त्यांच्याकडील बॅगेतील १ लाख ३० हजार रुपये रोख व मोबाईल, चेकबुक, एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे असा १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता.

या गुन्ह्यांचा तपास करत असतान अंमलदार ज्योतीबा पवार, अमित साळुंखे यांना चेतन वैराट व सुरज गायकवाड हे पिपंरीतील महात्मा फुलेनगर येथे मित्राच्या घरी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या सूचनेवरुन सहायक निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक प्रभाकर कापूरे व तपास पथकातील अंमलदार यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासातून इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. रोहीत बाबर, राजेश निघोले यांना बारामतीवरुन तसेच सासवड येथून जगन्नाथ वाघमारे याला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

रात्रीची वेळ व घटनास्थळी कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नसताना केवळ २ दिवसात कोंढवा पोलिसांनी या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

रोहीत बाबर व राजेश निघोले हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे करीत आहेत.