शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धरण साखळीत जमला ५ महिन्यांचा पाणीसाठा

By admin | Updated: July 6, 2016 03:23 IST

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, दिवसभरात

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, दिवसभरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे आजही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील नाले, ओढ्यांमधून पाणी येणे सुरूच होते. त्यामुळे चारही धरणांमधील पाणीसाठ्याने ५.४९ टीएमसीची पाणीपातळी गाठली असून, हे पाणी शहराला पुढील पाच महिने पुरेल एवढे असल्याचे महापालिका, तसेच पाटबंधारे विभागाने सांगितले.शनिवार (दि.२) पासूनच या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झालेली होती. रविवारी आणि सोमवारी पावसाचा जोर अधिक असल्याने शनिवारी सकाळी १.४१ टीएमसीपर्यंत खाली आलेला पाणीसाठा आज ५.५० टीएमसीवर पोहोचला आहे. शनिवारी या धरणसाखळीतील टेमघर धरणात ०.००, तर वरसगाव धरणात अवघा ०.०९ टीएमसी पाणी शिल्लक होते. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या पावसानेच टेमघर धरणात 0.३२ टीएमसी, तर वरसगाव धरणात १.८१ टीएमसी पाणी साठले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)दोन दिवसांत मिटला प्रश्नया चारही धरणांमध्ये झालेल्या पावसाने पुणे शहराला पुढील पाच महिने पुरेल एवढा पाणीसाठा तयार झालेला आहे. शहराला दरदिवशी महापालिकेकडून ० .०३ टीएमसी पाणी पाटबंधारे विभागाकडून घेतले जाते. त्यामुळे महिन्याला शहराला सरासरी ०.९० टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, जून महिना कोरडा गेल्याने धरणांमध्ये असलेले पाणी हे जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढेच होते. मात्र, आता हे पाणी शहरास डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत पुरेल एवढे आहे.