शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाख लिटर पाणी

By admin | Updated: April 4, 2016 01:34 IST

च्या पुणे विभागातर्फे होत असलेल्या ‘जितो- कनेक्ट २०१६’ या आंतरराष्ट्रीय संमेलन व परिषदेनिमित्त दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मॅरेथॉन, ट्रेजर हंट कार रॅली

बिबवेवाडी/पुणे : जितो (जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन) च्या पुणे विभागातर्फे होत असलेल्या ‘जितो- कनेक्ट २०१६’ या आंतरराष्ट्रीय संमेलन व परिषदेनिमित्त दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मॅरेथॉन, ट्रेजर हंट कार रॅली आणि बाईक रॅलीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यात हजारो पुणेकरांनी सहभाग घेतला. यातून दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल ५ लाख लिटर पाण्याची मदत होणार आहे, अशी माहिती जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.महावीर जैन वसतिगृहाजवळून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. यामध्ये सुमारे १० हजार नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये जेवढे अंतर जितके लोक धावले त्याप्रमाणात प्रतिकिमी १० लिटर पाणी याप्रमाणे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना पाणी दिले जाणार आहे.पाणी बचतीचे महत्त्व विशद करणारे फलक हातात घेऊन टी शर्ट परिधान केलेले नागरिक पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या या परिसरात आज सकाळी धावू लागले. मॅरेथॉनमध्ये पुण्यातील ५० ब्रँडेड बाईकर्स सहभागी झाले. त्यांनीही पाणी बचतीचा संदेश दिला.रॅलीमध्ये सजावट केलेल्या २०० कार आणि त्यामध्ये १ हजार महिला सहभागी झाल्या होत्या. ही रॅली फक्त महिलांसाठी होती. यामधून दुष्काळग्रस्तांना पाण्याची मदत करण्याबरोबरच पाणी बचत आणि पाणी वाचविण्यासंदर्भात जनजागृती करण्याचा उद्देश आहे, असे जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी सांगितले.‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’, ‘जल ईश्वरा तुज्या ओंजळी’, ‘जल ईश्वर है’ आदी संदेश लिहिलेले फलक व चित्र कारवर लावले होते. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरण रक्षणार्थ सजविलेली वसुंधरा अशा विविध कल्पक चित्राकृती कारवर लावल्या होत्या.रॅलीमध्ये सहभागी महिलांनी पुण्यातील २५ ऐतिहासिक व प्रसिद्ध ठिकाणी ठेवलेली वस्तू शोधून काढायची होती. त्यासाठी त्यांना संदर्भ देण्यात आला होता. जास्तीत जास्त वस्तू शोधणाऱ्यांबरोबरच जेवढे किलोमीटर अंतर त्यांनी कार चालविली तेवढे प्रतिकिमी १० लिटरप्रमाणे दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यात आले.राजेश साकला, विजयकांत कोठारी, शोभा धारिवाल, रंजना साकला, नरेंद्र छाजेड, अजित सेटिया, ओमप्रकाश रांका, चकोर गांधी, राजेश शहा, राहुल जैन, इंदर छाजेड, संयोजक सुजित भटेवरा, नगरसेविका मनीषा चोरबोले, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, ट्रेजर हंटच्या संयोजिका रिद्दी जैन, नेहा साकला, शर्मिला ओसवाल, रजनी भुरट, अनिता सरनोत, स्पर्धेच्या परीक्षक गीता गांधी-एथिराज, आएशा खान, कल्याणी उमराणी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)