शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूने घेतले ५० दिवसांत ५ बळी

By admin | Updated: February 20, 2015 00:35 IST

स्वाइन फ्लूमुळे शहरात आतापर्यंत ५ जणांचे बळी घेतले आहेत. हे सर्व ३४ ते ४८ वयोगटांतील पुरुष आहेत. सध्या स्वाइन फ्लूच्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पिंपरी : स्वाइन फ्लूमुळे शहरात आतापर्यंत ५ जणांचे बळी घेतले आहेत. हे सर्व ३४ ते ४८ वयोगटांतील पुरुष आहेत. सध्या स्वाइन फ्लूच्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या वाढतच चालली आहे. महापालिका वैद्यकीय विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नाहीत. वातावरणातील बदलामुळे आणि संसर्ग वाढल्याने शहरातील स्वाइन फ्लूच्या रुग्णात वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यापासून ही संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यात एकूण पाच जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. पिंपरीतील खासगी रुग्णालयात ४१ वर्षांच्या रुग्णाचा २४ जानेवारीला मृत्यू झाला. शहरातील स्वाइन फ्लूचा या वर्षातील पहिला बळी ठरला. मात्र, त्याच्या नातेवाइकांनी या आजाराने त्याचा मृत्यू झाल्याचा इन्कार केला आहे. व्यवस्थित उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. आंध्र प्रदेश येथील कृष्णा कुमारी या ४८ वर्षांच्या रुग्णाचा संत ज्ञानेश्वर रुग्णालयात ४ फेबु्रवारीला मृत्यू झाला. दोन दिवसांनी थेरगावच्या आदित्य बिर्ला मेमोरिअल रुग्णालयात तळेगाव दाभाडे येथील नीलेश देशपांडे या ३५ वर्षांच्या तरुणाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. पाठोपाठ १० फेब्रुवारीला पिंपळे निलख येथील महालिंगम अलीमुत्ता या ४० वर्षांच्या व्यक्तीचा वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यावरही काही दिवस बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथून वायसीएम रुग्णालयात दाखल करताच काही मिनिटांच त्याची प्राणज्योत माळवली. मंगळवारी (दि. १७) केशवनगर, चिंचवड येथील ३४ वर्षीय अभियंता असलेले निशांत अनिल कारखानीस यांचा वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. स्वाइन फ्लूच्या आजाराचे रुग्णांची संख्याही वाढतच आहे. शहरातील विविध रुग्णालयात १७ रुग्ण स्वाइन फ्लू बाधित आहेत. तसेच ५ रुग्ण संशयित रुग्ण आहेत. त्यापैकी वायसीएममध्ये २ तर १ संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. बिर्ला रुग्णालयात सर्वांधिक ६ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. निरामय रुग्णालयात २, मोरया रुग्णालयात १, स्टर्लिंग रुग्णालयात ३ व इतर रुग्णालयात २ रुग्ण उपचार घेत आहेत. आज गुरुवारअखेर ५, ३५७ जणांवर प्राथमिक उपचार केले.