शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जमीन खरेदीपोटी ४३ लाखांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

तिघांविरोधात गुन्हा दाखल बारामती : गडदरवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीतील ७२ गुंठे जमिनीच्या व्यवहारापोटी ४३ लाख ५९ ...

तिघांविरोधात गुन्हा दाखल

बारामती : गडदरवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीतील ७२ गुंठे जमिनीच्या व्यवहारापोटी ४३ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकाने शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी याबाबत विजय अनंतराव सावंत (रा. वसंतनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक विठ्ठल महानवर (रा. खंडोबाचीवाडी, ता. बारामती), दिलीप विठ्ठल टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी, पणदरे, ता. बारामती) व राहुल जगन्नाथ वाकुडे (रा. माळेगाव, ता. बारामती) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्च २०१९ मध्ये टेंगले यांच्या ओळखीने गडदरवाडी येथील अशोक महानवर यांची ७२ गुंठे जमीन खरेदी करण्याचे फिर्यादीने ठरवले. हा व्यवहार १० लाख रुपयांना ठरला. यातील एक लाखाची रक्कम धनादेशाद्वारे महानवर यांचे मेहुणे टेंगले यांच्या नावे देण्यात आली. तर उर्वरित नऊ लाखांची रक्कम धनादेश आणि रोख देण्यात आली. प्रत्यक्षात महानवर यांनी खरेदीखताने केवळ ३२ गुंठे जमीन दिली. जमिनीची नोंद लावण्यासाठी फिर्यादी तलाठ्याकडे गेले असताना अशोक महानवर यांनी चुलते शिवाजी महानवर यांना पाच वर्षे मुदत खरेदीने ही जमीन यापूर्वीच दिली असल्याचे दिसून आले. याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता त्याने कबुली दिली. राहुल वाकुडे याने जमिनीची नोंद करून देतो, असे आश्वासन फिर्यादीला दिले. प्रत्यक्षात नोंद करून दिलीच नाही. शिवाजी महानवर यांनी खरेदीखत उलटून देण्यासाठी पैशाची मागणी केली. त्या व्यवहारातही फिर्यादीने ६ लाख रुपये भरले. परंतु या जमिनीवर दोन पतसंस्थांचा बोजा असल्याचे दिसून आले. तसेच अशोक याने खासगी देवस्थान ट्रस्टकडूनही या जमिनीवर पैसे घेतल्याचे दिसून आले. या नोंदी कमी करण्यासाठी फिर्यादीने ७ लाख ७५ हजार रुपये दिले. पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठीही वेळोवेळी मोठ्या रकमा दिल्या. परंतु आरोपींनी पतसंस्थेचे कर्ज न भरता या रकमा स्वत:साठीच वापरल्या.

उरलेल्या क्षेत्राच्या खरेदीखतासाठी केवळ १लाख ४७ हजार रुपयांचा सरकारी खर्च येत असताना त्यापोटी २ लाख ४५ हजार रुपये घेतले. याशिवाय वाकुडे याने २ लाख ५० हजार रुपये विश्वासाने घेत ते परत केले नाहीत. या प्रकरणात अशोक महानवर याने २७ लाख ४१ हजार, दिलीप टेंगले याला १ लाख, तर राहुल वाकुडे याने १५ लाख १८ हजारांची रक्कम घेत फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.