शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

४१ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

By admin | Updated: January 21, 2016 01:22 IST

जिल्ह्यातील संभाव्य दृष्काळग्रस्त पूरस्थिती व निर्माण होणारी गंभीर पाणीटंचाई लक्षात घेता पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सुमारे ४० कोटी ९१

पुणे : जिल्ह्यातील संभाव्य दृष्काळग्रस्त पूरस्थिती व निर्माण होणारी गंभीर पाणीटंचाई लक्षात घेता पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सुमारे ४० कोटी ९१ लाख रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याला जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. गेल्या काही वर्षांत यंदा प्रथमच टंचाई आराखडा चार महिने अगोदरच म्हणजे जानेवारी महिन्यात मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रत्यक्ष पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच जिल्ह्यात टंचाईच्या कामांना सुरुवात होण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिली.कंद यांनी सांगितले, संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन नवीन विंधन विहिरी घेणे, नळ-पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ -पाणीपुरवठा योजना सुरू करणे, टँकर, विहिरीचे अधिग्रहण करणे, आदी विविध कामे सुचविण्यात आली आहेत. आराखड्याला उशिरा मान्यता मिळाल्यावर निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष काम करण्यासाठी खूपच उशीर होतो आणि पाऊस सुरू झाला, की टंचाईची कामे सुरू होतात हा आतापर्यंतचा अनुभव होता. त्यामुळे या वेळी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातच ग्रामसभेची मागणी लक्षात घेऊन टंचाई कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तब्बल ४८८ हातपंपांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी ३४ लाखांच्या निधीला बुधवारी पाणीपुरवठा व जलसंधारणच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यास जिल्हा परिषदेने सुरुवात केली आहे. संभाव्य पाणीटंचाईची झळ कमी करण्यासाठी हातपंप दुरुस्त करण्यात येणार आहेत. यात गंजलेले पाइप, नळ््या वाढविणे, कट्ट्यांची दुरुस्ती, पाइप बदलणे आदी देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेच्यामार्फत करण्यात येणार आहे.टंचाई कृती आराखड्यात प्रामुख्याने जिल्ह्यात २ हजार १५४ नवीन विंधन विहिरी घेण्यात येणार असून, त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर १८५ नळ-पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सर्वाधिक १५ कोटी रुपयांची तरतूद टँकरसाठी करण्यात आली आहे.