शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटवरून 40 लाखांची फसवणूक

By admin | Updated: November 8, 2014 23:56 IST

होगनास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीईओला ईमेल आयडीद्वारे वेळोवेळी रक्कम दिल्लीच्या एका खात्यावर ट्रान्स्फर करण्यास भाग पाडून 39 लाख 56 हजारांची फसवणुकीचा प्रकार घडला.

पुणो : होगनास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीईओला ईमेल आयडीद्वारे वेळोवेळी रक्कम दिल्लीच्या एका खात्यावर ट्रान्स्फर करण्यास भाग पाडून 39 लाख 56 हजारांची फसवणुकीचा प्रकार घडला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला 13 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
सोमपाल ऊर्फ पवनकुमार कालिचरण (वय 4क्, रा. व्हिलेज उंडलाजागीर, जि. बरेली, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कासीम अली नक्षअली (उंडलाजागीर, उत्तर प्रदेश), अरविंद सिंग (रा. नवी दिल्ली), एस. के. एन्टरप्रायङोस (नवी दिल्ली) यांचा पोलीस तपास करीत आहेत. राजेंद्रकुमार सारंगी (वय 44, रा. लाईफ पार्क सोसायटी, मोहम्मदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कोरेगाव पार्क येथील होगनास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत चीफ फायनान्स ऑफिसर व कंपनीचे सचिव म्हणून नोकरी करीत आहेत. फिर्यादी सारंगी यांना 5 मे ते 8 मे रोजी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या मेल आयडीवरून आरोपींनी ई मेल पाठविले व सारंगी यांना अरविंद सिंग या नावाच्या व्यक्तीच्या पंजाब नॅशनल बँक नवी दिल्ली येथील खात्यावर ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी तब्बल 39 लाख 56 हजार रुपयांची ट्रान्सफर करून  कंपनीची व फिर्यादीची फसवणूक केली. कालिचरण व नक्षअली या दोघांनी संगनमत करून एस. के. एन्टरप्रायङोस नावाची फर्म तयार करून त्या नावे बँकेत खाते उघडले. या खात्यावर त्यांनी जनतेचे ई-मेल आयडीची माहिती काढून त्यांना खोटे ई-मेल करून व्यवहाराची खोटी माहिती देऊन व्यवहाराचे पैसे स्वत:च्या खात्यावर जमा करून घेत. अशा प्रकारे त्यांनी फिर्यादी व इतरांचीही फसवणूक केली आहे. कालिचरण याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. कालिचरणच्या मदतीने इतर आरोपींचा शोध घ्यायचा आहे.  यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील सुचित्र नरोटे यांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरली. (प्रतिनिधी)