शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटसक्ती मोहिमेत ४ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: February 5, 2016 02:24 IST

‘हेल्मेटसक्ती’ आणि वाद हे पुणेकरांच्या दृष्टीने नवीन नाही. परंतु परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी पुण्यामध्ये हेल्मेटसक्ती राबवणार अशी घोषणा करताच वाहतूक पोलीस बाह्या

 पुणे : ‘हेल्मेटसक्ती’ आणि वाद हे पुणेकरांच्या दृष्टीने नवीन नाही. परंतु परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी पुण्यामध्ये हेल्मेटसक्ती राबवणार अशी घोषणा करताच वाहतूक पोलीस बाह्या सरसावून रस्त्यावर उतरले आहेत. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी दिवसभरात तब्बल ४ हजार ७१७ दुचाकीचालकांवर हेल्मेट कारवाई करीत तब्बल ४ लाख ७६ हजार ९00 रुपयांचा दंड वसूल केला. बुधवारच्या तुलनेत हा आकडा तब्बल तीन हजारांनी वाढला आहे. दिवसभरात पुणेकरांचा मात्र वाहतूक पोलिसांसोबत वाद होत होते.बुधवारी रावते यांनी औरंगाबादपाठोपाठ पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती राबवणार असल्याची घोषणा केली होती. औरंगाबाद शहरामध्ये हेल्मेटसक्ती राबवण्यात येत आहे. त्यासाठी एक महिन्याभरापासून जनजागृतीवर भर देण्यात आला होता. रावते यांच्या हस्ते हेल्मेट वापरणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. पुण्यामध्ये हेल्मेट घालणे आणि न घालणे यावरून कायमच वाद रंगत आलेला आहे. वाहतूकविषयक काम करणाऱ्या सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी कायमच हेल्मेट सक्तीचा विरोध केला आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळोवेळी हेल्मेटसक्ती करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या टीकेमुळे कारवाई थंडावली होती. हेल्मेट कारवाई विशेष मोहिमेद्वारे राबवली जात होती. मात्र, परिवहन मंत्र्यांनीच याची घोषणा केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी गुरुवारी हेल्मेट कारवाईला सुरुवात केली. पोलिसांसोबत दुचाकीचालकांचे वाद होताना दिसत होते. वाहनचालकांनी पोलिसांची ही कारवाई म्हणजे दांडगाई असल्याची टीकाही केली. पोलिसांनीही दिवसभरात ४ हजार ७१७ वाहनचालकांवर कारवाई करीत हेल्मेट कारवाई तीव्र केल्याची झलक दाखवून दिली आहे. ही कारवाई यापुढे आणखी तीव्र करणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले आहे.