शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

धानोरीत ४ दिवस विजेचा लपंडाव

By admin | Updated: May 8, 2017 03:08 IST

धानोरी परिसराला होणारा वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा शनिवार (दि. ६) वगळता सलग चौथ्या दिवशी रविवारीही (दि. ७) सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयेरवडा : धानोरी परिसराला होणारा वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा शनिवार (दि. ६) वगळता सलग चौथ्या दिवशी रविवारीही (दि. ७) सुरू होता. या भागाला होणारा वीजपुरवठा गुरुवारी (दि. ४) पहाटेपासून वारंवार खंडित होत आहे. यामुळे ऐन मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. शनिवारी दिवसभर सुरळीत असलेला वीजपुरवठा रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोनदा खंडित झाल्याने नागरिकांना ‘शॉक’ लागला. नगर रस्त्याकडून येणाऱ्या २२ केव्ही (किलोवॉट) क्षमतेच्या वीजवाहिनीतून धानोरी परिसराला वीजपुरवठा करण्यात येतो. यासाठी नगर रस्त्याकडून येणाऱ्या २२ केव्हीच्या वीजवाहिनीचे रूपांतर प्रत्येकी ११-११ केव्हीच्या वीजवाहिन्यांमध्ये करण्यात आले आहे. या भागात वीजग्राहकांची संख्या हजारो-लाखोंच्या घरात आहे. या भागाचा झपाट्याने विकास होत असून अल्पावधीतच अनेक छोटे-मोठे गृहप्रकल्प, शाळा, रुग्णालये, उद्योगधंदे व प्लॉटिंगवर घरांची मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. गुरुवारी नगर रस्त्यावर मिलिटरीच्या बीआरडी स्टेशनजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कचरा जाळल्याने पहाटे दोनच्या सुमारास धानोरी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या २२ केव्हीच्या वीजवाहिनीसह या वाहिनीच्या आजूबाजूला जमिनीत गाडलेल्या सर्वच छोट्यामोठ्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला. त्यामुळे धानोरीसह खराडी, वडगावशेरी व इतर भागांचाही वीजपुरवठा गुरुवारी पहाटेपासून खंडित झाला. महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ हालचाली करून खराडी व वडगावशेरीचा वीजपुरवठा ‘बॅक फिडिंग’ करून सुरळीत केला. धानोरीचा वीजपुरवठा संपूर्णपणे सुरळीत करण्यात मात्र महावितरणला गुरुवारी रात्रीचे बारा वाजले. त्यामुळे धानोरी परिसरातील नागरिकांचे गुरुवारी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत वीजेअभावी चांगलेच हाल झाले. त्यानंतर शुक्रवारीही धानोरीत विजेचा लपंडाव सुरू होता. शनिवारी मात्र धानोरीचा वीजपुरवठा सुरळीत राहिला. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धानोरीचा वीजपुरवठा दोनदा खंडित झाला.अधिकारी "नॉट रिचेबल"महावितरणचे धानोरी विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय ओगले यांचा मोबाईल मागील ३-४ दिवस बंद असल्याने त्यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. ओगले रजेवर असल्याने त्यांचा फोन बंद असल्याची माहिती विश्रांतवाडी केंद्राचे प्रमुख संजय घोडके यांनी शनिवारी दिली. घोडके यांचा मोबाईलही रविवारी बंद असल्याने त्यांचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. नगर रस्त्यावर कचरा जाळल्याने वीजवाहिन्या जळाल्या व वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणने अथक परिश्रम करून वीजपुरवठा सुरळीत केला. रस्त्याची खोदाई, कचरा जाळताना व इतर कामांमध्ये महावितरणच्या वीजवाहिन्या जमिनीखाली आहेत का, याची खात्री नागरिकांनी करावी. रस्त्याच्या खोदाईसारखी कामे करताना महावितरणला सूचना दिल्यास जागेची पाहणी करून जमिनीखाली वीजवाहिन्या कुठे आहेत, हे समजू शकते. मात्र अनेक वेळा पालिकेचे ठेकेदार कामे उरकण्याच्या नादात महावितरणला न कळवताच रस्त्याची खोदाई करतात आणि यामुळे अनेक वेळा जमिनीखालच्या वीजवाहिन्या नादुरुस्त होतात. पालिका व नागरिकांच्या या बेपर्वाईचा त्रास मात्र महावितरणचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सहन करावा लागतो.- जयश्री मालवकर, सहायक अभियंता, महावितरण