ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत १७ गावे आहेत, त्यातील एकादा अपवाद वगळता काही ठराविक गावा मध्येच पुन्हा पुन्हा रुग्ण सापडत आहेत. परिसरात सोमवारी १० रुग्ण व मंगळवारी ४ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिसरातील बाधितांची संख्या ९५६ झाली. ८८१ बरे झाले आहेत, २० जण उपचार घेत आहेत. ७ जण घरीच उपचार घेत आहेत. ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी डिंगोरे १ खामुंडी २ ,हिवरे खूर्द १ असे ४ रुग्ण सापडलेआहेत ,असे ओतूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीहरी साऱोक्ते यांनी सांगितले. डिंगोरे येथील बाधितांची संख्या ६६ झाली आहे.६२ बरे झाले आहेत. २ जणावर उपचार सुरू आहेत. १ घरीच उपचार घेत आहे. एकाचा मृत्यू झाला आहे.खामुंडी येथील रूग्ण संख्या३६ झाली आहे. ३४ बरे झाले आहेत .२ जणावर उपचार सुरू केले आहेत. हिवरेखूर्द येथील बाधितांची संख्या३६ झाली आहे. ३२ बरे झाले आहेत. २ जण घरीच उपचार घेत आहेत. २जणांचा मृत्यू झाला आहे, असे डॉ साऱोक्ते यांनी सांगितले .