शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटमुळे ३८ एकर ऊस खाक

By admin | Updated: December 3, 2014 02:55 IST

शॉर्टसर्किटमुळे येथील ३८ एकर ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थ तसेच विघ्नहरच्या यंत्रणेने शर्र्थीचे प्रयत्न करूनदेखील आग आटोक्यात आली नाही

ओझर : शॉर्टसर्किटमुळे येथील ३८ एकर ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थ तसेच विघ्नहरच्या यंत्रणेने शर्र्थीचे प्रयत्न करूनदेखील आग आटोक्यात आली नाही. जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक येथील सहकारनगर वस्तीमध्ये ही घटना घडली.जळीताची एवढी गंभीर घटना घडूनही वीज वितरण कंपनीचा कोणताही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकला देखील नाही. ट्रान्सफार्मवर असलेला अतिरिक्त लोड, झुकलेले पोल, तारांना पडलेला झोळ, ट्रान्सफार्मरची दयनीय अवस्था यामुळे दरवर्षी शॉर्टसर्किटमुळे तालुक्यात २०० ते २५० एकरपेक्षा जास्त ऊस जळून खाक होतो. यावर्षी ऊसतोडणी हंगामाच्याच सुरुवातीलाच २०० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला असल्याची माहिती विघ्नहरचे मुख्य शेती अधिकारी इंद्र्रभान कडू यांनी दिली. २८ शेतकरी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचे शिकार झाले. विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावून जळालेला ऊस २४ तासांच्या आतमध्ये गळितास आणला. महसूल विभाग, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन घाडगे, तालुका कृषी अधिकारी बी.बी. वाणी यांनी घटनास्थळाला भेट देऊन ऊस जळिताचा पंचनामा केला. आमदार शरद सोनवणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन ऊस जळिताची माहिती घेऊन नुकसानभरपाईबाबत प्रशासनाला सूचना केल्या. (वार्ताहर)