शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधून पळवलेल्या मुलीची सुटका ३६ दिवस आईवडिलांच्या डोळ्यांत पाणी

By admin | Updated: May 6, 2014 18:40 IST

लोणी काळभोर : दरभंगा (बिहार) येथून ३६ दिवसांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करून आणलेल्या १७ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस लोणी काळभोर पोलिसांनी तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिली असून, अपहरणकर्ता मात्र फरार झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिली.

लोणी काळभोर : दरभंगा (बिहार) येथून ३६ दिवसांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करून आणलेल्या १७ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस लोणी काळभोर पोलिसांनी तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिली असून, अपहरणकर्ता मात्र फरार झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिली.या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, उर्दू बजार दरभंगा (बिहार) येथे राहणार्‍या अल्पवयीन मुलीची शाळेत ये-जा करताना आळीत मामा-मामीकडे राहत असलेल्या मोहम्मद युसूफ याच्याशी ओळख झाली. कसलाही कामधंदा करत नसलेल्या मोहम्मदने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आपण लग्न करू तुला मी सुखात ठेवीन, असे गोड बोलून १ एप्रिल रोजी तो तिला घेऊन दरभंगा येथून हैदराबाद येथे आला.शाळेत गेलेली मुलगी सायंकाळपर्यंत घरी आली नाही, हे पाहून शासकीय नोकरीत असलेल्या तिच्या वडिलांनी आपले नातेवाईक व तिच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. परंतु, कसलीही माहिती न मिळाल्याने २ एप्रिल रोजी त्यांनी लेहरीचा सराय पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत १ एप्रिलपासून मोहम्मद युसूफ हासुद्धा गायब असल्याची माहिती पुढे आली. त्याच्या मामा-मामींकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलीस घेऊन मोहम्मद महाराष्ट्रात आल्याचे समजले.मोहम्मद याचा मोबाईल क्रमांक नातेवाइकांकडून मिळाला होता. पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स काढले. यावरून तो लोणी काळभोर परिसरात असल्याची माहिती मिळाली म्हणून लेहरीचा सराय पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रमा मानजी हे आज पहाटे मुलीच्या आईवडिलांसमवेत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आले. येथील पोलीस हवालदार सुरेश होले व क्षीरसागर यांची मदत घेऊन मुलीचा शोध घेतला असता ती घोरपडेवस्ती येथे एका खोलीत आढळून आली. परंतु पोलिसांची चाहूल लागताच मोहम्मद पळून गेला.तब्बल छत्तीस दिवसांनंतर आई व मुलीची भेट झाल्याने दोघींच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. मुलगी शोधून दिल्याबद्दल तिच्या नातेवाइकांनी लोणी काळभोर पोलिसांचे आभार मानले.