शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांना ठिबकसाठी एकरी ३५ हजार बिनव्याजी !

By admin | Updated: December 17, 2015 02:07 IST

दिवसेंदिवस जाणवणारी पाणीटंचाई, रासायनिक खतांची बचत व कार्यक्षमतेने वापर होणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे यांसाठी ठिबक सिंचन हे प्रभावी व गरजेचे असल्याने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना

अवसरी : दिवसेंदिवस जाणवणारी पाणीटंचाई, रासायनिक खतांची बचत व कार्यक्षमतेने वापर होणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे यांसाठी ठिबक सिंचन हे प्रभावी व गरजेचे असल्याने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी ठिबक योजना राबविणार असल्याची माहिती उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडे विविध ठिबक संच उत्पादित/पुरवठादार कंपन्यांकडून आलेल्या प्रस्तावाबाबत कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठिबक सिंंचनवाढीसाठी योजना राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. बेंडे यांनी याविषयी अधिक माहिती देताना नमूद केले, की ठिबक योजनेअंतर्गत ठिबक संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांचा एकरी ५ हजार रुपये रक्कम कारखान्याकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यानंंतर कारखाना सूचनेनुसार शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर ठिबक क्षेत्राचा आवश्यक आराखडा व संचउभारणी पूर्ण झाल्यानंतर शेतकी विभागाच्या शिफारशीनुसार एकरी २५ हजार रुपये बिनव्याजी वसूलपात्र रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या वतीने कारखान्यामार्फत ठिबक संचपुरवठाधारकाला देण्यात येईल.याव्यतिरिक्त एकरी १० हजार रुपयांसाठी कारखान्याशी करार केले. कंपनी १४ महिन्यांकरिता बिनव्याजी थांबणार आहे. अशा प्रकारे ३५ हजार रुपये बिनव्याजी रक्कम शेतकऱ्यांच्या गाळपास किंवा बेण्यास येणाऱ्या ऊस पेमेंटमधून कपात करण्यात येईल, असे बेंडे यांनी सांगितले.ते म्हणाले, ‘‘कपात केलेल्या रकमेपैकी १० हजार रुपये संबंधित ठिबक सिंचन कंपनीला अदा केले जातील. वरील योजना कारखान्याने शासनमान्यप्राप्त ठिबक उत्पादक/पुरवठादार कंपनीबरोबर रीतसर करार करण्यात येऊन राबविताना शेतकऱ्यांसाठी विविध सेवासुविधांचा अंतर्भाव असेल. त्यामध्ये प्रामुख्याने एका वर्षाचा ठिबक संच विमा तसेच १ लाखाचा वैयक्तिक शेतकरी विमा यासाठी प्रिमीयम रक्कम पुरवठादार कंपनीमार्फत भरली जाणार आहे.’’ (वार्ताहर)