शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पहिल्या टप्प्यात ३ हजार ५००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST

आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोनाची लस नव्या वर्षात आनंदाची बातमी : शनिवारपासून होणार लसीकरणास सुरूवात बारामती : नव्या ...

आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोनाची लस

नव्या वर्षात आनंदाची बातमी :

शनिवारपासून होणार लसीकरणास सुरूवात

बारामती :

नव्या वर्षात बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. शनिवारी (दि.

१६) पासून पहिल्या बारामती शहर व तालुक्यातील खासगी तसेच शासकिय सुमारे

३ हजार ५०० आरोग्य कर्मचाºयांना कोरोना लसीकरणास सुरूवात करण्यात येणार

आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

आरोग्य कर्मचाºयांचा कोरोना रूग्णांशी जवळून संपर्क येत असल्याने राज्य व

केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना

लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ५ पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये

१ व्हॅक्सीनेटर (प्रत्यक्ष लस देणारा) सोबत ४ सहकारी असणार आहेत.

त्यानुसार २५ आरोग्य कर्मचाºयांना मंगळवारी (दि. १२) पुणे येथे लसीकरणाचे

प्रशिक्षण देण्यात आले आहे. तालुक्यातील १ हजार २७८ शासकिय आरोग्य

कर्मचारी व खासगी वैद्यकिय क्षेत्रातील २ हजार २०० आरोग्य कर्मचाºयांनी

कोविन अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचाºयांना

पहिल्या टप्प्यात लसीकरणा करण्यात येणार आहे. दररोज ३०० ते ४०० आरोग्य

कर्मचाºयांना लसीकरण करण्यात येईल. पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये पहिल्या

टप्प्यातील हे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी रूई येथील शासकिय

महिला रूग्णालय व सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची

तयारी करण्यात आली आहे. यासाठी लसीकरण कक्ष उभा करण्यात आला आहे. यामध्ये

प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्षाची निर्मिती करण्यात आली

आहे. लस घेण्यापूर्वी सबंधीत आरोग्य कर्मचाºयाची संपुर्ण शाररिक तपासणी

करण्यात येणार आहे. तर दुसºया टप्प्यात पोलीस , होमगार्ड, नगर परिषदेचे

सर्व कर्मचारी, शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना लस दिली

जाणार आहे. तर पुढील तिसºया टप्प्यात साठ वर्षा पुढील व्यक्तींना तसेच

मधुमेह व रक्तदाब असणाºया नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी योग्य

वेळी सूचना देण्यात येतील असे वैद्यकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे यांनी

सांगितले.

लसीकरणानंतर सबंधीत आरोग्य कर्मचाºयाला सुमारे आर्धातास निरिक्षणाखाली

ठेवण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीस लसीकरण केल्यानंतर त्रास सुरू

झाल्यास प्राथमिक उपचारासाठी एएसआय किट याठिकाणी उपलब्ध ठेवण्यात आले

आहेत. लसीकरण सुरू झाले असले तरी सर्वांपर्यंत लस पोहचण्यास वेळ लागणार

आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटाईझर व सोशल डिस्टंन्सचे नियम पाळणे गरजचे

आहे.

- डॉ. मनोज खोमणे

तालुका आरोग्य अधिकारी, बारामती

-----------------------------

फोटो ओळी : रूई (बारामती) येथील शासकिय महिला रूग्णालयात कोरोना लसीकरण

कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

१२०१२०२१-बारामती-०४

-----------------------------